पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेची प्रसार-प्रदर्शन मांडणी ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या निमित्ताने मुंबईत होत आहे. हा कार्यक्रम १३ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रदर्शन केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर विविध दालनांमध्ये एकाच वेळी अनेक बैठका, चर्चासत्रांना प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला ६८ देशातील उद्योगपती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. प्रदर्शनस्थळी विविध ११ क्षेत्रे आणि १३ राज्ये यांची स्वतंत्र दालने आहेत. आठवड्याभरात महाराष्ट्रात ४ लाख कोटीची गुंतवणूक व्हावी यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. यातून १२ लाख रोजगार निर्मिती होईल असा अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा