मुंबई : अचूक, तातडीने आणि ठिकाणानुसार हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने ‘मिशन मौसम’ प्रकल्प हाती घेतला असून भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या १५०व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही मोगीम मंगळवारी सुरू करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय हवामान विभागाचा १५० वर्षांचा प्रवास हा केवळ एका विभागाचा प्रवास नसून भारतातील आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आहे. या १५० वर्षांमध्ये विभागाने कोट्यवधी भारतीयांची सेवा केली असून ही संस्था भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचे प्रतिक आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. डॉपलर हवामान रडार, स्वयंचलित हवामान केंद्रे, धावपट्टी हवामान निरिक्षण प्रणाली आणि जिल्हानिहाय पर्जन्य निरिक्षण केंद्राच्या संख्येत वाढ करण्यात आल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

हेही वाचा >>> मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी आलोक आराधे; देवेंद्र कुमार यांची दि

हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी लागणारी अत्याधुनिक साधन सामग्री मिशन मौसमद्वारे उपलब्ध होणार आहे. हवामान अंदाज अधिक अचूक, तातडीने आणि ठिकाणनिहाय वर्तविणे त्यामुळे शक्य होणार आहे. सध्या देशात ‘एस बँड’ दर्जाचे केवळ २२ रडार आहेत.

प्रकल्पाचे उद्दिष्ट

‘मिशन मौसम’चा कृषी, विमान वाहतूक, आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन आणि आरोग्य या प्रमुख क्षेत्रांना फायदा होणार असून हवामान निरिक्षण, अंदाज, इशारा यासाठी हा प्रकल्प प्रामुख्याने काम करेल. त्याचे उद्दिष्ट केवळ देशातील हवामान अंदाज सुधारण्यापुरते मर्यादीत नाही तर काही हवामानासंबंधीच्या घटनांचे व्यवस्थापन करणे आणि आवश्यकतेनुसार पाऊस, गारपीट, धुके अशा आपत्तींवर नियंत्रण मिळवणे देखील आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

भारताला कोणत्याही प्रकारच्या हवामानाला, त्यातील बदलाला तोंड देण्यासाठी सज्ज करुन हवामानप्रती स्मार्ट राष्ट्र बनवण्यासाठी ‘मिशन मौसम’ योजना सुरु करण्यात आली आहे. शाश्वत भविष्य आणि भविष्यासाठी आवश्यक सज्जतेच्या दिशेने असलेल्या भारताच्या वचनबद्धतेचे ते प्रतीक आहे. नरेंद्र मोदीपंतप्रधान