डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठासही २० कोटींचे अनुदान
कसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : स्वत:च्या कुटुंबाचा विचार करणारे कधी इतरांच्या कुटुंबाचा विचार करत नाहीत. त्यामुळे परिवारवादी सरकारपासून लांब राहा. याउलट आमचे सरकार हे शेतकरी, युवाशक्ती यांना प्राधान्य देणारे आहे. त्याचाच दाखला जम्मू-काश्मीरमध्ये मिळतो. येत्या काही वर्षांत जम्मू-काश्मीरला विकसित करण्याचा संकल्प आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
‘आयआयटी मुंबई’च्या रिसर्च पार्क इमारतीचा उद्घाटनसह देशभरातील विविध उपक्रमांचा उद्घाटन सोहळा मंगळवारी पार पडला. यावेळी मोदी यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. संवेदनशील सरकार जेव्हा असते तेव्हा ते सगळ्यांचा विचार करून काम करते. सध्याचे सरकार हे संवेदनशील असल्याने आपला देश हा संतुलित विकासाच्या मार्गावर आहे. मागील दहा वर्षांत शैक्षणिक व्यवस्थेत अनेक बदल केले आहेत. हेच आधुनिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो, असे मोदी म्हणाले.
हेही वाचा >>> १० टक्के स्वतंत्र आरक्षण; विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत चर्चेविना विधेयक मंजूर
‘आयआयटी मुंबई’ येथे झालेल्या उद्घाटन सोहळ्यात खासदार मनोज कोटक, ‘आयआयटी मुंबई’च्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष डॉ. शरद सराफ, संचालक प्रा. सुभाषिश चौधरी, रिसर्च पार्क फाउंडेशनचे प्रभारी प्राध्यापक स्वरूप गांगुली आदी उपस्थित होते.
डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठासही २० कोटींचे अनुदान
प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन झाले. या योजनेच्या प्रकल्प मंजुरी मंडळाने (पीएबी) देशातील ३५ विद्यापीठांना बहु-विषय शिक्षण व संशोधन विद्यापीठे (एमईआरयू) या घटकाखाली १०० कोटी रुपये आणि ७३ विद्यापीठांना विद्यापीठांचे बळकटीकरण या घटकाखाली प्रत्येकी २० कोटींचे अनुदान दिले आहे. राज्यातील पहिले आणि भारतातील दुसरे समूह विद्यापीठ असलेल्या मुंबईतील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठास ‘पीएम-उषा’अंतर्गत ‘ग्रॅन्टस टू स्ट्रेंथन युनिव्हर्सिटीज’ (जीएसयू) या घटकाखाली २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या अनुदानाच्या माध्यमातून गुणवत्ता वाढविणे, प्रवेशाचा विस्तार करणे, नवीन तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमाची निर्मिती, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन प्रोग्रामिंगसारख्या भविष्यातील तंत्रज्ञानातील अद्वितीय शैक्षणिक अभ्यासक्रम व सामाजिक विज्ञान, वाणिज्य व बँकिंगमधील ट्रान्सडिसिप्लिनरी अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. तसेच ई-ग्रंथालय सुविधा, स्टार्ट-अप, संगणकीकृत समुपदेशन आणि मार्गदर्शन केंद्राची स्थापना आदी सुविधा पुरवल्या जाणार आहेत, अशी माहिती डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी दिली.