मोदी सरकार कॅगचा वापर स्वतःला क्लिनचिट देण्यासाठी करत आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. कॅग अहवालाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी सरकारच्या या भूमिकेवर जोरदार आक्षेप घेतला.

आतापर्यंत कॅगचे अनेक रिपोर्ट पाहिले आहेत. मी पहिल्यांदाच कॅगच्या रिपोर्टमध्ये एखाद्या विभागाचे कौतुक करताना पाहिले आहे. कॅगचे काम असते की, सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेणे व त्यात काही आक्षेपार्ह असेल, भ्रष्टाचार असेल तर ते समोर आणणे. आजपर्यंत कॅगने चांगले काम झाल्याचे सांगितलेले नाही असेही पाटील म्हणाले.

राफेलमध्ये घोटाळा झाला नसेल तर तो कॅगमध्ये मांडण्याची गरज काय ? असा सवाल करतानाच कॅग एखाद्या मंत्र्यांचं किंवा खात्याचं कौतुक केले आहे. आजपर्यंत असे कधीच घडलेच नाही. मोदी सरकार सर्व स्वायत्त यंत्रणेचा उपयोग करून घेत आहे असा आरोपही त्यांनी केला.

Story img Loader