संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबळ्याने कोळशेत परिसरातील किरण मिल कंपाऊंड परिसरात सोमवारी सायंकाळी पुन्हा दर्शन दिल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण कायम आहे. गेल्या तीन महिन्यापासून सुरु असलेल्या बिबळ्याच्या वावरामुळे स्थानिक रहिवाशी या परिसरात अक्षरश जीव मुठीत घेऊन रहात आहेत. वन विभागाच्या वतीने या बिबळ्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येतो. मात्र बिबळ्या त्यांच्या जाळ्यात सापडत नाही.  त्यामुळे वन विभागाचे अधिकारीही  हतबल झाले आहेत. सोमवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास कोलशेत परिसरातील किरण मिल कंपाऊंड मध्ये एका रहिवाशास बिबळ्याचे पुन्हा दर्शन झाले.नागरीकांनी त्याला पिटाळले मात्र, वन खात्याचे कर्मचारी, अधिकारी, पोलीस आणि अग्निशमन दलाची मदत येत नसल्याने स्थानिकांमध्ये यंत्रणांविरोधात रोष आहे.

Story img Loader