गर्दीच्या वेळी उपनगरी रेल्वेच्या डब्यांचे दरवाजे अडवून अन्य प्रवाशांना प्रवेश रोखणाऱ्या व प्रसंगी दमदाटी व मारहाण करणाऱ्या ‘दादा’ प्रवाशांवर रेल्वे पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उचलला असला तरी अवघ्या २०० रुपयांत त्यांना सोडून दिले जात असल्यामुळे या कारवाईचा फारसा प्रभाव पडलाच नाही. पश्चिम रेल्वेवर ही कारवाई होत असतानाच मध्य रेल्वेवर मात्र प्रवाशांची दादागिरी सुरूच आहे.
विरार-भाइंदर येथून चर्चगेटपर्यंत प्रवास करणारे अनेक प्रवासी गटागटाने दरवाजे अडवून प्रवास करत असतात आणि अन्य प्रवाशांना गाडीत चढण्या-उतरण्यापासून रोखत असतात. अनेकदा प्रवाशांची यावरून हाणामारी होत असतेच पण अनेकदा प्रवासी चालत्या गाडीतून खाली पडतात. गाडीच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणे रेल्वे कायदा १५६ अन्वये गुन्हा आहे.
पश्चिम रेल्वेवर पोलिसांनी चार दिवसांपासून अशा दरवाजे अडवून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली असून शुक्रवारी ३२ तर शनिवारी ५२ प्रवाशांना बोरिवली, अंधेरी, वांद्रे आणि दादर येथे पकडण्यात आले. त्यांना मुंबई सेंट्रल येथील रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना २०० रुपये दंड आकारून सोडून देण्यात आले. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असून सोमवारी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल यांची संयुक्त कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रेल्वेच्या ‘डोअर कीपर’ना पोलिसांचा हिसका!
गर्दीच्या वेळी उपनगरी रेल्वेच्या डब्यांचे दरवाजे अडवून अन्य प्रवाशांना प्रवेश रोखणाऱ्या व प्रसंगी दमदाटी व मारहाण करणाऱ्या ‘दादा’ प्रवाशांवर रेल्वे पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उचलला असला तरी अवघ्या २०० रुपयांत त्यांना सोडून दिले जात असल्यामुळे या कारवाईचा फारसा प्रभाव पडलाच नाही.
First published on: 03-03-2013 at 02:57 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police action on door kipper of railway