मुंबई : वांद्रे पूर्व येथून पिस्तुलासह चार सराईत आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी दरोड्याच्या हेतूने तेथे आल्याचा संशय असून याप्रकरणी खेरवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. सर्व आरोपी सराईत असून त्यांच्याविरोधात यापूर्वीही चार ते सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समीर शेख उर्फ पाया ऊर्फ बाटला, गफूर खान, आरीयन शेख व फैय्याज शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चौघांनाही वांद्रे पूर्व येथील अहिंसा नगर शासकीय वसाहतीजवळून पकडण्यात आले आहेत. आरोपींकडून देशी पिस्तुल, कोयता व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. सर्व आरोपी सराईत आहेत. यातील बाटला विरोधात सहा गुन्हे दाखल असून त्याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. गफूरविरोधात सात गुन्हे दाखल असू त्याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. आरीयन शेख विरोधात चार गुन्हे दाखल असून त्यालाही एकावर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तसेच फैय्याज शेख याच्याविरोधातही पाच गुन्हे दाखल असून गेल्यावरही त्याला सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले होते. आरोपींचा आणखी एक साथीदार असून त्याचा शोध सुरू आहे.

हेही वाचा…पोलीस कोठडीत मृत्यू किती ?

आरोपींविरोधात दरोड्याची तयारी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे पूर्व येथे अनेक शासकीय इमारती, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची घरे आहेत. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. याशिवाय ठिकठिकाणी शोध मोहिम राबवली जात आहे. याप्रकरणी खेरवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrest four suspects with pistols linked to robbery plot in bandra east mumbai print news psg