अश्लिल छायाचित्र सोशल मिडियावर टाकण्याची धमकी देत ३२ वर्षीय महिला वकिलाकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी याच महिलेच्या कार्यालयात काम करणारा ऑफिस बॉय निघाला. ही महिला वकील नेपियन्सी रोड येथे राहत असून तिचे वडिल मोठे व्यावसायिक आहेत. ८ जुलै पासून तिला अज्ञात मोबाईलवरून धमकीसाठी फोन येत होते. दोन कोटी रुपये नाही दिले तर अश्लिल छायाचित्रे आणि चित्रफिती सोशल मिडियावर टाकण्याची धमकी ती व्यक्ती देत होती. या प्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास करून भाईंदर येथून आरोपीला अटक केली.  पत्नीच्या आजारपणासाठी पैसे हवे असल्याने हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले.

Story img Loader