अश्लिल छायाचित्र सोशल मिडियावर टाकण्याची धमकी देत ३२ वर्षीय महिला वकिलाकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी याच महिलेच्या कार्यालयात काम करणारा ऑफिस बॉय निघाला. ही महिला वकील नेपियन्सी रोड येथे राहत असून तिचे वडिल मोठे व्यावसायिक आहेत. ८ जुलै पासून तिला अज्ञात मोबाईलवरून धमकीसाठी फोन येत होते. दोन कोटी रुपये नाही दिले तर अश्लिल छायाचित्रे आणि चित्रफिती सोशल मिडियावर टाकण्याची धमकी ती व्यक्ती देत होती. या प्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास करून भाईंदर येथून आरोपीला अटक केली. पत्नीच्या आजारपणासाठी पैसे हवे असल्याने हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा