मुंबई : हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाच्या पुलावर एका व्यक्तीला मारहाण करून ७०० रुपये लूटणाऱ्या चौघांना रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकातील पुलावरून रविवारी रात्री १२.३० च्या सुमारास तक्रारदार घरी जात असताना चौघांनी त्याला मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील ७०० रुपये लुटून पलायन केले. याप्रकरणी वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वडाळा युनिट क्रमांक ४ मधील अधिकाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाची तपासणी केली. तसेच, तकारदाराला मारहाण करणारे चौघे पुन्हा किंग्ज सर्कल येथे येणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली.

हेही वाचा – हनुमान चालिसा पठण प्रकरण : राणा दाम्पत्याचा दोषमुक्तीसाठी विशेष न्यायालयात अर्ज, पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

रेल्वे पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता सदर ठिकाणी सापळा रचून या चौघांना अटक केली. याप्रकरणी सैफ शेख उर्फ मोनू, मन्सुर शेख, अमीर अन्सारी आणि एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली असून, त्यांचा साथीदार ढेप्याचा रेल्वे पोलीस शोध घेत आहेत. पुढील चौकशीसाठी हे प्रकरण वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. या गुन्ह्याची २४ तासांच्या आत उकल करण्यात आली असून आरोपींनाही अटक करण्यात यश आल्याची माहिती लोहमार्ग गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांनी दिली.