मुंबई : झोपडपट्टी निष्कासन कारवाईदरम्यान पोलिसाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी ५३ वर्षीय व्यक्तीला अटक केली. सदरअली इद्रीस असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो चेंबूर छेडा नगर येथील रहिवासी आहे. गुरूवारी चेंबूर छेडा नगर येथे कांदळवन संरक्षण समितीकडून निष्कासन कारवाई करण्यात येत होती.

त्यावेळी बंदोबस्ताला तैनात पोलीस हवालदार संजय भिलारे यांना आरोपीने धक्काबुकी केली. त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसाच्या हाताला लागले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात आले. आरोपीविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police beaten up during slum eviction operation the accused was arrested mumbai print news amy
First published on: 28-06-2024 at 22:48 IST