चर्नीरोड येथील एका हॉटेल व्यावसायिकाला धमकाविल्याबद्दल अभिनेता सुनील शेट्टीविरुद्ध व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
चर्नी रोड येथील लिट्ल अ‍ॅटली रेस्टॉरण्ट हे हॉटेल ब्रिंदेश शहा या हॉटेल व्यावसायिकाने अभिनेता सुनील शेट्टीकडून १२ वर्षांच्या करारानुसार चालविण्यास घेतले आहे. हा करार करून चार वर्षे झाली असून आता जागांचे भाव वाढल्याने सुनील शेट्टीला पुन्हा हे हॉटेल आपल्या ताब्यात हवे होते. म्हणून सुनील शेट्टीने गुरुवारी रात्री हॉटेलमध्ये घुसून आपल्या अंगरक्षकाच्या मदतीने शहा यांना बाहेर काढून हॉटलेला टाळे ठोकले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.