१९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपीला पकडणाऱ्या हवालदारांची व्यथा
तेवीस वर्षांपूर्वी याच दिवशी मुंबईसह देशाला हादरवून सोडणारे साखळी बॉम्बस्फोट घडले होते. अत्यंत प्रतिकून परिस्थितीत मुंबई पोलिसांनी यातील आरोपींना पकडून आणले. स्फोटानंतर तब्बल १५ वर्षांनी दोन हवालदारांना यातील एका आरोपीची माहिती मिळाली आणि त्यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कक्ष सहाच्या मदतीने त्याला बेडय़ा ठोकल्या. मात्र त्या आरोपीवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने जाहीर केलेले बक्षीस तब्बल आठ वर्षे उलटले तरी मिळालेले नाही. ही कारवाई करणाऱ्या संपूर्ण पथकाला हे बक्षीस मिळावे यासाठी एक हवालदार सातत्याने पाठपुरावा करत आहे.
१९९३च्या मुंबई स्फोटातील एक महत्त्वाचा आरोपी करीमउल्ला खान ऊर्फ केके नालासोपारा भागात आपली ओळख बदलून राहात असल्याची माहिती पोलीस शिपाई जयदेव जाधव यांना तब्बल १५ वर्षांनी मिळाली. सीबीआय केकेला पकडण्यासाठी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहिर केले होते. शिपाई जाधव यांनी त्यावेळी निर्मल नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवालदार दिलीप िशदे यांना ही माहिती सांगितली. जुल २००८ पासून दोघांनीही केकेवर पाळत ठेवण्यास सुरूवात केली होती. २१ ऑगस्ट २००८ रोजी त्यावेळी गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष सहाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अन्सार पिरजादे यांना ही माहिती मारिया यांच्या सुचनेवरुन कळविण्यात आली. पिरजादे यांनी २१ अधिकारी-कर्मचारी यांच्या पथकासह धाव घेत मोस्ट वॉन्टेड अशा केकेला बेडय़ा ठोकल्या. सीबीआयने जाहिर केलेले बक्षीस मिळावे यासाठी हवालदार िशदे यांनी याविषयी विचारणा करण्यास सुरुवात केली. मात्र, सीबीआयकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. मुंबई पोलिसांकडून सातत्याने स्मरणपत्रे पाठवूनही सीबीआय बक्षिसाबाबत काहीच बोलत नव्हती. दरम्यानच्या काळात राकेश मारिया मुंबईचे पोलीस आयुक्त झाले, त्यांनी पुन्हा हे बक्षीस मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, पुन्हा थंडा प्रतिसादच मुंबई पोलीसांच्या वाटय़ाला आला. याविषयी मुंबई पोलीस दलाचे प्रवक्ते पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांना विचारले असता, केकेला पकडण्याच्या मोहिमेत सहभागी असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना बक्षीस मिळावे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असून नेमका सीबीआयच्या बाजूने काय समस्या आहे हे कळायला मार्ग नाही, असे ते म्हणाले. आता हवालदार शिंदे यांनी थेट सीबीआयकडेच माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज करुन बक्षीस का मिळत नाही, असा प्रश्न केला आहे.
कोण आहे केके?
केके याने बॉम्बस्फोटामध्ये झालेली स्फोटके, आरडीएक्स, एके-५६ रायफल, हँडग्रेनेड यांची रायगड जिल्’ाातील म्हसळा येथून मुंबई आणि परिसरातील ठिकाणी पोहोचवण्याचे काम केले. स्फोट झाल्यानंतर लपून राहिलेला केके ३ जुल रोजी मुंबईहून कराचीला पळून गेला. २००६ पर्यंत दाऊद टोळीसोबत राहिल्यानंतर २००६ मध्ये तो मुंबईत परत आला. तेव्हापासून तो नालासोपारा येथे ओळख बदलून राहात होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा