ताडदेवमधील पोलिस वसाहतीत राहणाऱया एका पोलिसाने महिलेची हत्या करून नंतर स्वतः आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. सुधीर राणे असे या पोलिस कर्मचाऱयाचे नाव आहे. त्याने सकाळी स्वतःकडील सर्व्हिस रिव्हॉल्वरने आधी महिलेवर आणि नंतर स्वतःवरही गोळी झाडली. 
प्राथमिक तपासात राणे यांचे संबंधित महिलेबरोबर अनैतिक संबंध होत, अशी माहिती पुढे आली आहे. राणे हे मुंबई पोलिसांच्या सुरक्षापथकात नियुक्तीला होते. मुंबईचे सत्र न्यायाधीशांच्या सुरक्षेसाठी त्यांना तैनात करण्यात आले होते.

Story img Loader