प्रेयसीच्या मदतीने पत्नी आणि पोटच्या अडीचवर्षाच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपी पतीला आणि त्याच्या प्रेयसीला शाहू नगर पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे. पतीच्या घराबाहेर असलेल्या अनैतिक संबंधांबाबत समजल्यानंतर आरोपी आणि पत्नीमध्ये वारंवार भांडणे सुरु असायची. अखेर या सर्वाचा शेवट करण्यासाठी त्याने पत्नी आणि मुलीच्या हत्येचा कट रचला.

दुहेरी हत्याकांडाची ही घटना गुरुवारी सकाळी घडली होती. तेहसीन जेहरा इलियास सय्यद(३४) आणि अडीच वर्षाची चिमुरडी यांची गळा चिरून हत्या केल्यानंतर मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. तेहसीन आरोपी इलियास सोबत डायमंड अपार्ट्मेंट, १० वा माळा जास्मिन मिल रोड, मुंबई येथे राहात होती.

आरोपी इलियास याचे आफरीनबानो हिच्यासोबत अनैतिक संबंध होते. याबाबत तेहसीनला समजताच दोघांमध्ये भांडणे व्हायची. प्रेमप्रकरणात अडसर ठरणाऱ्या पत्नी आणि मुलीला मार्गातून हटवण्यासाठी आरोपी इलियासने कट रचून दोघांची हत्या केली

Story img Loader