रत्नागिरीहून ठाण्यात आलेल्या दोन तरुणींना अश्लील इशारे देऊन त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न करणारा रिक्षाचालक फुलचंद गुप्ता (४३) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली असून ठाणे न्यायालयाने त्याला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या तरुणी ठाण्यातील कार्यक्रम आटोपून भिवंडीकडे जाण्यासाठी रिक्षात बसल्या. प्रवासादरम्यान रिक्षाचालक फुलचंद गुप्ता याचे अश्लील इशारे आणि अपहरणाचा डाव ओळखून त्या दोघींनी रिक्षातून उडी मारल्यामुळे दोघीही जखमी झाल्या. रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.
या तरुणींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रिक्षाचालकाचे रेखाचित्र काढले होते. त्याच आधारे नौपाडा पोलिसांनी फुलचंदला अटक केली. सहा महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे घडलेल्या स्वप्नाली लाड घटनेचेही काही धागेदोरे फुलचंदच्या मिळतात का, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.
‘त्या’ रिक्षाचालकास कोठडी
रत्नागिरीहून ठाण्यात आलेल्या दोन तरुणींना अश्लील इशारे देऊन त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न करणारा रिक्षाचालक फुलचंद गुप्ता (४३) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली
First published on: 04-03-2015 at 12:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police custody for accused who harassed girls in auto