क्यू नेट आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अभिनेते बोमन इराणी यांच्या मुलाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी तपास करत आहे. क्यू नेट कंपनीच्या सव्वाचारशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेकडे अभिनेते बोमन इराणी यांचा मुलगा दानिश इराणी याच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. तक्रारदार गुरुप्रीतसिंग आनंद यांनी , दानिशला या कंपनीतून मोठा आर्थिक फायदा झाला असून त्याबाबत ही तक्रार दाखल केली आहे. बोमन इराणी यांचे क्यू नेट कंपनीत खाते नाही. मात्र दानिश यांना मिळालेल्या कमिशनची आम्ही चौकशी करत आहोत, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांनी दिली.  मात्र त्याचा घोटाळ्यात सहभाग आहे की नाही, ते सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले.

Story img Loader