एरवी मी बंदोबस्ताला असताना नेहमी सर्तक असायचो .पण आज खुर्चीवर निवांत बसलोय..ही प्रतिक्रिया आहे आर्थर रोड कारागृहाबाहेर कसाबच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या एका पोलिसाची. कसाबला फाशी दिल्याचे वृत्त समजल्यानंतर इथल्या पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. इंडो तिबेटीयन सीमा पोलिसांच्या कमांडोव्यतिरीक्त मुंबई पोलिसांचा खडा पहारा कारागृहाच्या बाहेर अहोरात्र होता. प्रत्येकाला आलटून पालटून येथे बंदोबस्ताची डय़ुटी करावी लागत असे. ‘दुसरीकडच्या बंदोबस्तापेक्षा इकडचा बंदोबस्त हा कठीण होता, अशी प्रतिक्रिया या पोलिसाने दिली.   

Story img Loader