सोनसाखळी चोरांविरुद्ध संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी केलेली कारवाई न्यायालयाने रद्दबातल ठरविली आहे. दहाहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या या सोनसाखळी चोरांविरुद्ध पोलिसांना आता भारतीय दंड संहितेतील कलमानुसारच कारवाई करावी लागणार आहे. रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी २ मार्च २०१४ रोजी सलमान ऊर्फ जॅकी पपली हुसैन आणि कासिम सय्यद हैदर हुसैन या दोघांना अटक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करून या दोघांना अटक केली.  इतकेच नव्हे तर शबाना हुसैन या तरुणीचाही सहभाग असल्यामुळे तिलाही अटक करण्यात आली. सलमान हुसैन आणि कासिम सय्यद या दोघांवर अनुक्रमे आठ व दहा गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांना आढळून आले. त्यामुळे त्यांनी मोक्कान्वये कारवाई केली. या कारवाईला मोक्का न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा