मुंबई : शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरील विवाहेच्छुक तरुणींची छायाचित्रे चोरून ती युटय़ूबरून बिभत्सपणे पसरवणाऱ्याविरोधात ताडदेव पोलिसांनी गुन्हा नोंदवला. विवाहेच्छुक तरुणींच्या युटय़ूबवरून प्रसारीत होणाऱ्या बिभत्स छायाचित्र, अश्लिल टीप्पणीला ‘लोकसत्ता’ने तीन महिन्यांपुर्वी वाचा फोडली होती. पीपल इंटरअ‍ॅक्टीव्ह इंडिया कंपनीचे हे संकेतस्थळ, अ‍ॅप आहे. कंपनीच्या सहयोगी संचालक उषा कुमार यांनी या प्रकाराबाबत ताडदेव पोलिसांकडे तक्रार दिली. संकेतस्थळ किंवा अ‍ॅपवरील माहिती सभासदाव्यतिरिक्त अन्य कोणीही पाहू, हाताळू शकत नाही. त्यामुळे यु टय़ूबवरील प्रकारामागे सभासदांपैकीच कोणीतरी असावे, असा संशय कुमार यांनी व्यक्त केला. ‘लोकसत्ता’ने ४ मे रोजी हे वृत्त प्रसिद्ध केले होते.

Story img Loader