अभिनेत्री जिया खानसोबत आपण ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत असल्याची कबुली सूरज पांचोलीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच ज्या रुग्णालयात जियाचा गर्भपात करण्यात आला होता, त्या रुग्णालयाची ओळखही पटली असून तेथील डॉक्टरांचा जबाबही नोंदविला जाणार आहे. जियाने सूरजला लिहिलेल्या पाच प्रेमपत्रांमध्ये आणि आत्महत्येआधी लिहिलेल्या पत्रातसमानता असल्याचे आढळले. या पत्रांमध्ये सूरजविषयी प्रेम व्यक्त करून तो आपल्याशी क्रूरपणे वागतो असे लिहिले होते. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रावर तसेच या पाचही प्रेमपत्रांवर जियाने सही केलेली नव्हती. त्यांचे हस्ताक्षर तपासून पाहिले जात आहे. दरम्यान, ज्या रुग्णालयात जियाने गर्भपात केला होता त्या रुग्णालयाचा शोध पोलिसांनी लावला. रुग्णालयात गर्भपाताचे पुरावे सापडले तर सूरजवर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले.
जियाचा गर्भपात झालेल्या रुग्णालयाची ओळख पटली
अभिनेत्री जिया खानसोबत आपण ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत असल्याची कबुली सूरज पांचोलीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच ज्या रुग्णालयात जियाचा गर्भपात करण्यात आला होता, त्या रुग्णालयाची ओळखही पटली असून तेथील डॉक्टरांचा जबाबही नोंदविला जाणार आहे.
आणखी वाचा
First published on: 13-06-2013 at 01:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police gets jiah khans abortion report from hospital