मुलुंम्डमध्ये मागील आठवड्यात झालेल्या गोळीबाराची घटना बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी हा गोळीबार केल्याचा आरोप या गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाने केला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास करून फिर्याद देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.
१३ फेब्रुवारी रोजी मुलुंड येथील न्यू राहुल नगर येथे सचिन राठोड आणि त्याचे दोन साथीदार गोळीबारात जखमी झाले होते. प्रतिस्पर्धी टोळीतील गणेश थापा आणि राकेश थापा यांनी आपल्यावर गोळीबार केल्याची तक्रार सचिन राठोड याने दिली होती. या गोळीबारात सचिन राठोडसह त्याचे दोन साथीदार अनिल बोदडे आणि राकेश ठाकूर किरकोळ जखमी झाले होते. परंतु पोलीस तपासात आरोपी सचिन याने निष्काळजीपणे कट्टा हाताळल्याने गोळी सुटून ही दुर्घटना घडल्याचे निष्पन झाले. या प्रकरणी खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी अनिल बोदाडे आणि राकेश ठाकूर याला अटक केली तर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने सचिनला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

Story img Loader