एकीकडे मुंबईत डान्स बार सुरू होऊ नयेत यासाठी राज्य सरकार न्यायालयात खेपा मारत असतानाच शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या ‘सायलेंट बार’चे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिवसाढवळ्या भरवस्त्यांमध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या या सायलेंट बारमध्ये नृत्य सोडले तर सर्व प्रकारची अश्लील कृत्ये होतात; पण या बारच्या विरोधात तक्रारी येत नसल्यामुळे कारवाईस अडचणी येत असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
काही दिवसांपूर्वी चेंबूरच्या सिंधी कॅम्पमध्ये एका बारवर समाजसेवा शाखेने धाड टाकली. यात प्रत्येक टेबलाभोवती आडोसे निर्माण करून अश्लील चाळे करणाऱ्या गिऱ्हाईकांकडून दंड आकारत ५-६ मुलींवर पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर दहिसर येथेही अशाच प्रकारे सुरू असलेल्या बारवर धाड टाकून पोलिसांच्या समाजसेवा शाखेने कारवाई केली. गेल्या दीड महिन्यात पोलिसांनी अशा तीन बारवर छापे टाकून कारवाई केली आहे.
वेश्या व्यवसाय आणि डान्स बार यांच्यामधला टप्पा म्हणजे सायलेंट बार असे आपण म्हणू शकतो, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अशा बारमध्ये वेटर म्हणून महिला काम करतात, त्यांना स्पर्श करण्याबरोबरच त्यांना बाजूला बसवून त्यांच्याबरोबर अश्लील चाळे अशा बारमध्ये करण्याची मुभा असते. आंबटशौकिनांचा अड्डा असलेले हे बार बहुतांश वेळी दिवसाच सुरू असतात, त्यामुळे स्थानिक पोलिसांचाही याच्याकडे कानाडोळा होतो, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. चारशे ते पाचशे रुपये जास्तीचे भरून बारमध्येच केलेल्या वेगळ्या विभागात ग्राहकांना प्रवेश मिळतो. मुंबईमध्ये अशा प्रकारे किती बार सुरू आहेत, याचा अंदाज लावणे कठीण असून अशा बारवर कारवाई केल्यानंतर केवळ भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ प्रमाणे कारवाई करण्याचा अधिकार आहे, असे एका पोलिसाने सांगितले.

डान्स बारमुळे देशातील तरुणाई चुकीच्या मार्गाने वाटचाल करीत आहे. अधिकृतपणे डान्स बारवरील बंदी उठवली नसतानाही अनेक ठिकाणी डान्सबार सुरु आहेत. पोलीस व राजकारणी यांची मदतीमुळे बेकायदेशीरपणे चालणाऱ्या डान्स बारवर बंदी आणली जात नाही. अनधिकृतपणे चालणाऱ्या डान्सबारमधून पोलिसांना हफ्ता पुरविला जातो. त्यामुळे या डान्स बारवर बंदी आणण्यासाठी विशेष पोलिस दलाची निर्मिती करण्याची गरज असून या दलामार्फत बेकायदेशीरपणे चालणाऱ्या डान्स बारवर छापा मारुन डान्स बारवर नियंत्रण आणले जाऊ शकते.
-रुही कपूर, युबिका फाऊंडेशन

Despite complaints and protests no action taken on unauthorized slums and parking at Turbhe Sector 19F
अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी ‘तारीख पे तारीख’ तुर्भे येथील भूखंडावरील कारवाईसाठी पालिकेची चालढकल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Viral video young boy sitting on railway track while talking phone video goes viral social Media
जीव एवढा स्वस्त असतो का? रेल्वे रुळावर फोनवर बोलत बसला; समोरुन ट्रेन आली अन्…VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
Kulgaon Badlapur municipal news in marathi
वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होणार नाही; बदलापूर मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन, प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या मागणीला यश
rasta roko kudalwadi marathi news
पिंपरी : अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवरील कारवाईला विरोध; कुदळवाडीतील व्यावसायिकांकडून रस्ता बंद
Madhya Pradesh liquor ban
मध्य प्रदेश सरकारचा १७ धार्मिक शहरांत दारूबंदीचा निर्णय; पण अंमलबजावणी अवघड का?
bombay high court orders to stand with dont drink and drive banner at traffic junction
सिग्नलवर ‘दारू पिऊन वाहन चालवू नका’चा फलक घेऊन उभा राहा ; उच्च न्यायालयाची आगळी शिक्षा
Police team arrests thief who tried to steal mobile phone at Thane railway station thane news
ठाणे रेल्वे स्थानकात ८० हजार रुपयांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न; चोरट्याला पोलीस पथकाने केली अटक

डान्स बारमुळे देशातील तरुणाई चुकीच्या मार्गाने वाटचाल करीत आहे. अधिकृतपणे डान्स बारवरील बंदी उठवली नसतानाही अनेक ठिकाणी डान्सबार सुरु आहेत. पोलीस व राजकारणी यांची मदतीमुळे बेकायदेशीरपणे चालणाऱ्या डान्स बारवर बंदी आणली जात नाही. अनधिकृतपणे चालणाऱ्या डान्सबारमधून पोलिसांना हफ्ता पुरविला जातो. त्यामुळे या डान्स बारवर बंदी आणण्यासाठी विशेष पोलिस दलाची निर्मिती करण्याची गरज असून या दलामार्फत बेकायदेशीरपणे चालणाऱ्या डान्स बारवर छापा मारुन डान्स बारवर नियंत्रण आणले जाऊ शकते.
-रुही कपूर, युबिका फाऊंडेशन

खबरींच्या खंडणीची सोय
अवैध रीतीने चाललेल्या या कामांची खबर देणारे खबरीही या बारचा वापर खंडणी उकळण्यासाठी करत असल्याने त्याची माहिती पोलिसांपर्यंत येत नसल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. कुठल्या बारमध्ये कधी असे प्रकार चालतात त्याची नेमकी माहिती खबऱ्यांकडून मिळणे खूप कमी झाले आहे. त्यातच, अनेक खबरी हे पोलिसांचा धाक दाखवून बारमालकांकडून पैसे उकळतात, त्यामुळे असे बार आपल्या आसपास बिनदिक्कतपणे सुरू राहतात, असेही या अधिकाऱ्याने अधोरेखित केले.
सायलेंट बार म्हणजे काय?
कुठल्याही साधारण बारप्रमाणेच हे बार असून यात ग्राहकांसाठी बसण्याची वेगळी सोय असते. अशा बारमध्ये एका टेबलावर बसलेला ग्राहक दुसऱ्या टेबलावरच्या ग्राहकाला दिसणार नाही यासाठी लाकडी आडोसा तयार केलेला असतो. या आडोशांमध्ये मुलींशी सर्रास अश्लील चाळे चालतात. दिवसा गुपचूप सुरू असलेल्या या बारना पोलिसी भाषेत ‘सायलेंट बार’ म्हटले जाते.

Story img Loader