आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपये लाच घेणाऱ्या पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने अटक केली. मनोहर गवारे असे या पोलीस निरीक्षकाचे नाव असून तो कुर्ला (पूर्व) येथील विनोबा भावे पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
चोरीच्या प्रकरणात संतोष नावाच्या टेम्पो चालकाला पोलिसांनी अटक केली होती.मनोहर गवारेकडे हा तपास होता. संतोषला न्यायालयातून जामिनावर सोडण्यासाठी अनुकूल अहवाल तयार करण्यासाठी एक लाख रुपये द्यावे लागतील, असे गवारे यांनी आरोपीच्या वडिलांना सांगितले. आरोपीचे वडील हमालीचे काम करतात. शेवटी रक्कम २५ हजार रुपयांवर ठरली. फिर्यादीने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. बुधवारी कुर्ला येथील बरकत इस्लाम शाळेजवळ गवारे यांनी फिर्यादीला पैसे देण्यासाठी बोलावले होते. तेथे पोलिसांनी सापळा लावून गवारे यास अटक केली.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jun 2013 रोजी प्रकाशित
लाचखोर पोलीस निरीक्षकास अटक
आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपये लाच घेणाऱ्या पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने अटक केली. मनोहर गवारे असे या पोलीस निरीक्षकाचे नाव असून तो कुर्ला (पूर्व) येथील विनोबा भावे पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
First published on: 20-06-2013 at 03:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police inspector arrested for taking bribe