अटकपूर्व जामीन मिळालेल्या आरोपीकडून जामिनाच्या हमीची पडताळणी करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरे पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला लाच प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. दिवाकर सावंत (४९) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
गोरेगाव युनिट क्र. २ येथे असलेल्या खोलीच्या मालकीवरून दोन जणांमध्ये वाद सुरू आहे. या वादातून खोलीची आधीची मालकीण तसेच आताचा मालक आणि त्याचे कुटुंबीय यांच्यावर आरे सब पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सध्याचा मालक असलेली व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांना या गुन्ह्य़ात अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून त्यासाठी दिली जाणारी हमी परिपूर्ण नव्हती. यासाठी पोलीस निरीक्षक दिवाकर सावंत यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली. या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. आणि कारवाईत सावंत रंगेहाथ सापडले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा