मे महिन्यात मुंबईत झालेल्या पोलीस भरतीदरम्यान आवश्यक मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मृत्युमुखी पडलेल्या पाच उमेदवारांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयाला देण्यात आली.
न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळेस अतिरिक्त सरकारी वकील मििलद मोरे यांनी प्रतिज्ञापत्र सादर करीत मृत्युमुखी पडलेल्या पाच उमेदवारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आल्याची माहिती दिली. मालेगाव येथील अंबादास सोनावणे (२४), जळगाव येथील साईनाथ माळी (१८), नाशिक-दिंडोरी येथील विशाल केदारे (२३) आणि राहुल सकपाळे यांच्यासह आणखी एकाचा या भरतीप्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकाराची न्यायालयाने स्वत: दखल घेत राज्याच्या गृह विभाग आणि पोलीस महासंचालकांना नोटीस बजावली होती व स्पष्टीकरण मागितले होते. वास्तविक या भरतीप्रक्रियेविषयी ‘ऑल महाराष्ट्र ‘ामन राईट्स असोसिएशन’ या संस्थेने उच्च न्यायालयाला पत्र लिहिले होते. सध्याच्या पोलीस भरतीमध्ये २५०७ जागांसाठी राज्याच्या विविध भागांतून उमेदवार मुंबईत दाखल झाले असून उमेदवारांना अमानवी वागणूक दिली जात आहे. परिणामी या भरतीप्रक्रियेदरम्यान चारजणांना बळी गेल्याचा आरोप पत्रात केला होता. योग्य नियोजन करून भरती प्रक्रिया व्हायला हवी. उमेदवारांना राहण्याची, रुग्णवाहिकेची तसेच इतर मूलभूत सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत, अशी मागणी पत्रातून करण्यात आली.
भरती प्रक्रियेसाठी पोलिसांना विशिष्ट मार्गदर्शक तत्वे घालून देण्यात यावी. तसेच या सर्व प्रकरणावर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती नेमण्यात यावी आणि मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती संस्थेतर्फे करण्यात आली आहे. याच पत्राची दखल घेऊन न्यायालयाने स्वत:हून याचिका दाखल करून घेत संबंधितांना नोटीस बजावली होती.
आश्रमशाळा विद्यार्थ्यांना २५ क्रीडा गुण देण्याची मागणी
मुंबई: परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी दिल्या जाणाऱ्या २५ क्रीडा गुणांचा लाभ आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनाही लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
क्रीडा संचालनालयामार्फत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील नियमित विद्यार्थ्यांसाठी तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर वयोगटानुसार मुला-मुलींसाठी वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले जाते. यात सहभागी होणाऱ्या गुणवंत खेळाडूंना त्यांच्या कामगिरीबद्दल लाभही दिला जातो. शालांत परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी २५ गुणही दिले जातात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा