लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई पोलीस भरतीत दोन पदांसाठीची लेखी परीक्षा एकाच दिवशी होत असून उमेदवारांना दूरची केंद्रे आली आहेत. मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला अवघ्या अर्ध्यातासांत कसे पोहोचायचे असा पेच उमेदवारांसमोर उभा राहिला आहे.

Minister Pankaja Mundes clarification on Anjali Damanias allegations
बीडमधील अधिकारी मी नेमलेले नाहीत, आरोपांबद्दल मंत्री पंकजा मुंडे यांचे स्पष्टीकरण
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
dhananjay Munde
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव; मित्रपक्षाच्या नेत्यांची आक्रमक भूमिका
Rain in North Konkan Meteorological Department has predicted Mumbai news
उत्तर कोकणात आठवडा अखेरीस पाऊस? जाणून घ्या, हवामान विभागाचा अंदाज काय
Environment Department approves billboards near coastal road
सागरी किनारा मार्गाजवळच्या जाहिरात फलकांना पर्यावरण विभागाची मंजुरी
High Court comments that Solapur Municipal Corporation action in land acquisition is illegal Mumbai news
अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण न करताच ३७ वर्षांनंतरही जमिनीचा ताबा स्वत:कडेच; म्हाडा, सोलापूर महापालिकेची कृती बेकायदा असल्याची उच्च न्यायालयाचे टिप्पणी
Dabholkar murder case Objection to Dabholkar familys appeal against release of accused
दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींच्या सुटकेविरोधातील दाभोलकर कुटुंबीयांच्या अपिलाला आक्षेप
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

मुंबई पोलिस भरतीत शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा ११ व १२ जानेवारी रोजी होणार आहे. पोलीस शिपाई, कारागृह शिपाई, पोलीस शिपाई ड्रायव्हर या तीन पदांसाठी परीक्षा होणार आहे. त्यातील कारागृह शिपाई, पोलीस शिपाई ड्रायव्हर या पदांची परीक्षा ११ जानेवारी रोजी आहे तर पोलीस शिपाई या पदासाठीची परीक्षा १२ जानेवारी रोजी होणार आहे. बहुतेक उमेदवार तिनही पदांसाठी अर्ज भरतात. मात्र ११ जानेवारी रोजी होणाऱ्या दोन्ही परीक्षासाठी उमेदवारांना दूरची परीक्षा केंद्रे मिळाली आहेत. नियमानुसार परीक्षा सुरु होण्यापूर्वी दोन तास परीक्षा केंद्रावर पोहोचणे अनिवार्य आहे. सकाळी १०.३० ते १२ आणि दुपारी २.३० ते ४ या कालावधीत परीक्षा होणार आहे. त्यामुळे १२ वाजता पहिली परीक्षा संपताच दुसरी परीक्षा सुरु होण्यापूर्वी २ तास म्हणजेच १२.३० वाजता अन्य परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागणार आहे. एक परीक्षा देऊन दुसरे परीक्षा केंद्र गाठण्यासाठी उमेदवारांना जेमतेम अर्ध्यातासाचा कालावधी मिळणार आहे. मुंबईत त्याच उपनगरांतील केंद्र असले तरी वाहतूक, गर्दी लक्षात घेता अर्ध्यातासात पोहोचणे आव्हानात्मक आहे.

आणखी वाचा-दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींच्या सुटकेविरोधातील दाभोलकर कुटुंबीयांच्या अपिलाला आक्षेप

एका उमेदवाराला पहिल्या परीक्षेसाठी विक्रोळी येथील केंद्र मिळाले आहे तर दुसऱ्या परीक्षेसाठी मालाड येथील केंद्र आहे. रेल्वे, बस अशा कोणत्याही माध्यमातून दुसऱ्या परीक्षेचे केंद्र गाठण्यासाठी तासापेक्षाही अधिक कालावधी लागतो. असे असताना, दोन टोकाच्या उपनगरांमधील केंद्रात अर्ध्यातासात कसे पोहोचायचे असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. परीक्षासाठी येणारे अनेक उमेदवार ग्रामिण भागांतील आहेत. काही पहिल्यांदाच मुंबईत येणार आहेत. मुंबईतील रहदारी अंगवळणी नसलेल्या उमेदवारांनी केंद्रावर अत्यल्प वेळात कसे पोहोचायचे असा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करून वेगवेगळ्या दिवशी परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे. पोलिस भरतीची संधी वारंवार मिळत नाही. त्यामुळे एकापेक्षा अनेक पदांसाठी उमेदवार अर्ज करतात. त्यातच शारीरिक चाचणीचा टप्पाही पार केला आहे. मात्र, आता एका पदाची परीक्षा गमावण्याची वेळ येणार आहे, असे एका उमेदवाराने सांगितले.

Story img Loader