मुंबई : इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत नक्कल करताना चार विद्यार्थी रविवारी सापडले. त्यांच्या विरोधात मुंबईतील भांडुप, गोरेगाव, कस्तुरबा मार्ग व मेघवाडी पोलीस ठाण्यांमध्ये चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईतील पोलीस भरतीमध्ये आरोपी परीक्षार्थीनी डेबिट कार्डसदृश बोलण्याचे यंत्र, सिम कार्ड असलेले पेन अशा उपकरणांचा वापर केला. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे नक्कल रोखण्यात यश आले आहे.

पोलीस शिपाई पदाच्या ७,०७६ जागांसाठी रविवारी मुंबईत लेखी परीक्षा झाली. गोरेगाव पश्चिम येथील उन्नत नगर महापालिका शाळेमध्ये मुंबई पोलीस भरतीतील लेखी परिक्षेचे ११३२ क्रमांकाचे केंद्र होते. रविवारी तेथे झालेल्या लेखी परीक्षेत वर्ग क्रमांक १६ मधील एक परीक्षार्थीची हालचाल संशयास्पद आढळली. त्यामुळे त्याची तपासणी केली असता त्याच्या कानात काहीतरी उपकरण असल्याचे पोलिसांना आढळले. त्यानंतर त्याची तपासणी केली असता त्याने हाताच्या मनगटापासून कोपऱ्यापर्यंत सनग्लोज घातले होते. त्यात सिमकार्ड, चार्जिग सॉकेट, मायक्रो माइक असलेले सिम कार्डसदृश इलेक्ट्रॉनिक उपकरण सापडले. त्यानंतर डॉक्टरांकडे नेऊन त्याच्या कानात लपवलेले इअरबड काढण्यात आले. अखेर पोलीस नाईक संतोष शेडगे यांच्या तक्रारीवरून त्या परीक्षार्थी विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात फसवणूक व परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. अटक परीक्षार्थीचे नाव युवराज जारवाल (१९) असून तो गंगापूर येथील रहिवासी आहे. नक्कल करण्यासाठी त्याने वापरलेले उपकरण पोलिसांनी जप्त केले असून तो उपकरणाद्वारे संपर्कात असलेल्या व्यक्तीबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
teacher lost 20 lakh rupees share market
शिक्षकाला वीस लाखांचा गंडा, सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कारवाई
bail POCSO, High court grants bail,
पोक्सोअंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन

 बोरिवली पूर्व येथील कस्तुरबा मार्ग खोत हायस्कूल येथील शाळेतील केंद्र क्रमांक १२१५ क्रमांकाच्या केंद्रात रवींद्र काळे (३३) हा परीक्षार्थी मोबाइल पेनमध्ये सिम कार्ड घातलेल्या उपकरणातून मित्रासोबत बोलत असताना आढळून आला. तपासणीत त्याने पेनमधील उपकरणातून मित्र शिवम बेलुसे याच्याशी संपर्क साधून प्रश्नांची उत्तरे मिळवत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काळेला सीआरपीसी कलम ४१(१)(अ) अंतर्गत नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. तिसरा प्रकार जोगेश्वरी पूर्व येथील गुंफा मनपा शाखेतील केंद्रात घडला. तेथे नितेश आरेकर या परीक्षार्थीला इलेक्ट्रॉनिक उपकरण व सिम कार्डसह पकडण्यात आले. तो बीडमधील शिरूर येथील रहिवासी असून तो अशोक ढोले नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होता. त्यालाही नोटीस देऊन सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

 भांडुप पश्चिम येथील ब्राइट स्कूल व्हिलेज रोड येथील परीक्षा केंद्र क्रमांक ०७०२ येथे बबलू मेंढरवाल (२४) नितेश रघुनाथ आरेकर, (२९) हे परीक्षार्थी कानात सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करून नक्कल करत असताना आढळले. त्यांच्या विरोधातही भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

७८ हजार ५२२ परीक्षार्थी

मुंबईतील पोलीस शिपाई पदासाठी ७८ हजार ५२२ परीक्षार्थीनी रविवारी लेखी परीक्षा दिली. शहरातील २१३ केंद्रांमध्ये ही परीक्षा झाली. त्यासाठी १२४६ पोलीस अधिकारी व पाच हजार ९७५ कर्मचाऱ्यांची बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. त्यापूर्वी त्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यांच्या सतर्कतेमुळेच हे गैरप्रकार पकण्यात यश आल्याचे उपायुक्त (मुख्यालय-२) तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. ९९४ पोलीस चालकपदासाठी १४ मेला लेखी परीक्षा होणार आहे.

Story img Loader