लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील २०२२-२३ मधील पोलीस भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातील ५७ केंद्रांवर मैदानी चाचणी घेण्यात आली. शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या १८ हजार उमेदवारांना आता ७ जुलै रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेला बसावे लागणार आहे.

case has been registered in the death of two children due to suffocation in a motor vehicle
मुंबई : मोटरगाडीमध्ये गुदमरून दोन बालकांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Shivajinagar, teacher, Umarkhed taluka,
यवतमाळ : नोकरीचा तिसराच दिवस अन काळाने साधला डाव…
UP Hathras Stampede News in Marathi
Hathras Stampede : “गर्दी आणि देणगी जमवण्याकरता…”, अटक केलेल्या सेवेकऱ्यांची पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती!
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…

राज्यभरात १७ हजारांहून अधिक पदांसाठी भरती होत आहे. राज्यातील ६६ केंद्रांपैकी २२ केंद्रांमध्ये ही लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यात मिरा भाईंदर, छत्रपती संभाजी नगर शहर, नवी मुंबई, सोलापूर शहर, नाशिक शहर, अमरावती शहर, मुंबई लोहमार्ग, पालघर, सांगली, नाशिक ग्रामीण, अहमद नगर,धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी नगर ग्रामीण, बीड, जालना, यवतमाळ, लातूर, वाशीम, भंडारा, वर्धा व पुणे लोहमार्ग या २२ पोलीस आयुक्तालय आणि पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अखत्यारित ही परिक्षा होणार आहे. शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची नावे महाआयटीच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आली आहेत.

आणखी वाचा-ऐतिहासिक संदर्भ असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र : सरकारच्या निर्णयाने मराठा समाजात दुही

मुंबईतील भरती प्रक्रिया १५ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता

मुंबईतील भरती प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. योग्य मैदान न मिळाल्यामुळे मुंबईतील मैदानी चाचणी अद्याप होऊ शकलेली नाही. ही भरती प्रक्रिया १५ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईतील भरती प्रक्रिया १५ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. तसे त्यांच्याकडून आम्हाला कळवण्यात आल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) राजकुमार व्हटकर यांनी सांगितले.