आयपीएलमधील सट्टेबाजीवरून चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ गुरुनाथ मेयप्पन यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चौकशीसाठी शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बोलावले आहे. चौकशीसाठी येण्यास मुदतवाढ देण्याची मागणी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी फेटाळली. त्यामुळे मेयप्पन यांना शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गुन्हे शाखेच्या पोलिसांपुढे हजर व्हावेच लागेल.
मुंबईतील गुन्हे शाखेच्या पोलिसांचे एक पथक गुरुवारी चेन्नई येथे मेयप्पन यांच्या निवासस्थानी गेले होते. मेयप्पन निवासस्थानी नसल्यामुळे पोलिसांनी त्यांना समन्स बजावले. घर सांभाळणाऱया व्यक्तीकडे हे समन्स देण्यात आले. त्यामध्ये चौकशीसाठी शुक्रवारी दहा ते पाच या वेळेत गुन्हे शाखेमध्ये यावे, असे पोलिसांनी म्हटले होते.
चौकशीसाठी हजेरी लावण्याला सोमवारपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी मेयप्पन यांनी केली होती. मात्र, पोलिसांनी ती फेटाळली आहे. त्यामुळे मेयप्पन यांना शुक्रवारीच पोलिसांपुढे हजर व्हावे लागणार आहे, असे गुन्हे शाखेतील उपायुक्त दर्जाच्या एका अधिकाऱयाने सांगितले.

Story img Loader