मुंबई : सांताक्रुझ येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीची आई व तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला. पीडित मुलीच्या आईच्या प्रियकराने तिवर अत्याचर केला. तसेच आईने हा प्रकार कोणालाही न सांगण्याबाबत धमकावले होते. पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार व बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

१५ वर्षीय पीडित मुलगी शिक्षण घेत आहे. तक्रारीनुसार २०२२ पासून पीडित मुलीवर अत्याचार सुरू होता. आरोपीने पीडित मुलीचा विनयभंग, बलात्कार केला होता. तसेच डिसेंबर २०२४ पासून आतापर्यंत पीडित मुलीच्या आईने तिला वारंवार व्हिडिओ कॉल केले. यावेळी पीडित मुली अत्याचार करण्यात येत होता. याशिवाय हा सर्व प्रकार कोणालाही सांगू नये यासाठी आईने पीडित मुलीला धमकी दिली. पीडित मुलीने नुकतीच निर्मल नगर पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी पीडित मुलीची आई व तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader