मुंबई : लोकलमधून पडून होणाऱ्या प्रवाशांच्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे अपघात रोखण्यासाठी सेवेत वातानुकूलित लोकल दाखल करावी, तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा उभारावी यासह विविध उपाययोजना करण्याची मागणी लोहमार्ग पोलीस आयुक्तानी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंबई विभागात २०२१ पासून आतापर्यंत लोकलमधून पडून एकूण ७६४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा >>> पुढल वर्षी वयाची १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या युवकांना आताच मतदारयादीत नाव नोंदणी करता येणार
उपनगरांतून मुंबई शहराच्या दिशेने सकाळी, तसेच परतीसाठी सायंकाळी रेल्वेमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड मोठी आहे. कार्यालय, व्यवसाय किंवा अन्य कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांचा यात समावेश असतो. परंतु हा प्रवास काही प्रवाशांसाठी जीवघेणा ठरतो. अनेक वेळा गर्दीमुळे लोकलच्या डब्यात प्रवेश करता येत नाही. परिणामी, नाईलाजाने डब्याच्या दरवाजावळ उभे राहूनच प्रवाशांना प्रवास करावा लागतो. अशा पद्धतीने धोकादायक प्रवास करताना काही वेळा प्रवासी तोल जाऊन लोकलमधून पडतात. या अपघातात प्रवासी जखमी होतो किंवा त्याला प्राण गमवावे लागतात.
हेही वाचा >>> मुंबई : ॲक्सिस बँकेची फसवणूक करणाऱ्या सराफाला अटक
जानेवारी – सप्टेंबर २०२२ या नऊ महिन्यांत लोकल, तसेच मेल-एक्स्प्रेसमधून पडून ४८७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून यामध्ये ४४४ पुरुष आणि ४३ महिलांचा समावेश आहे. तसेच २०२१ मध्ये रेल्वे गाड्यांमधून पडून २७७ प्रवाशांचा मृत्यू, तर ४४२ प्रवासी जखमी झाले होते. गेली अनेक वर्षे असे अपघात होत असून ते रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. याबाबत सहा – सात महिन्यांपूर्वी पत्र देण्यात आले असून अपघात रोखण्यासाठी स्वयंचालितपणे दरवाजे बंद होणारी वातानुकूलित लोकल सेवेत दाखल करावी, लोकल फेऱ्या वाढवाव्या, गर्दीच्या नियंत्रणासाठी यंत्रणा उभारावी यासह विविध उपाययोजना करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे, असे लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी सांगितले. मात्र त्याला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. याशिवाय रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
वातानूकुलित लोकल गाड्यांना विलंबच
असे अपघात रोखण्यासाठी साध्या लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा प्रयोग काही वर्षापूर्वी करण्यात आला होता. मात्र तो फसला. मात्र यानंतर मुंबई रेल्वे विकास महामंडळाने ‘एमयूटीपी ३’अंतर्गत ४७ आणि ‘एमयूटीपी-३ ए’अंतर्गत १९१ मेट्रो प्रकारातील वातानुकूलित लोकल सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तत्पूर्वीच रेल्वे मंत्रालयाने मध्य आणि पश्चिम रेल्वेला एकूण १३ वातानुकूलित लोकल उपलब्ध केल्या. मात्र ही संख्या अपुरी आहे. लोकलमधून पडून होणारे प्रवाशांचे अपघात रोखण्यासाठी आणखी काही वातानुकूलित लोकल सेवेत दाखल होणे गरजेचे आहे. मात्र या लोकल सेवेत दाखल होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. याबाबतची निविदा आणि तांत्रिक तपशीलाला अद्याप रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळालेली नाही. बोर्डाची मंजुरी मिळताच एमआरव्हीसीकडून निविदा आणि त्यानंतर लोकल खरेदी प्रक्रिया राबविली जाईल. त्यानंतर सुमारे दोन वर्षांमध्ये टप्प्याटप्यात २३८ लोकल सेवेत दाखल होतील.