चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकात महाजन (४२) यांनी पोलीस ठाण्यातच सव्र्हिस रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर चेंबूरच्या खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
चुनाभट्टी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले महाजन हे दहशतवाद विरोधी सेलचे प्रमुख होते. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास जेवण झाल्यानंतर ते आपल्या दुसऱ्या मजल्यावरील केबीनमध्ये दोन पोलीस हवालदारांसह बसले होते. थोडय़ा वेळाने त्यांनी महत्त्वाचे लेटर टाईप करायचे आहे असे कारण देत बाहेर जायला सांगितले. त्यानंतर तीन वाजून दहा मिनिटांनी त्यांनी आपल्या सव्र्हिस रिव्हॉल्वर मधून गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकत सर्व पोलीस केबीनमध्ये धावत गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महाजन यांना चेंबूरच्या सुराणा सेठिया रुग्णालयात दाखल केले. जबडय़ाच्या आतून झाडलेली गोळी गालातून बाहेर निघाली. त्यांच्यावर अतिदक्षता रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त खालिद कैसर यांनी दिली.
महाजन हे कुल्र्याच्या नेहरूनगर पोलीस वसाहतीमधील १०७ क्रमांकाच्या इमारतीत राहत होते. बुधवारी सकाळी त्यांचे पत्नीशी भांडण झाले होते. त्यांची पत्नी दोन्ही मुलांना घेऊन घर सोडून गावी निघून गेली होती. त्यामुळे महाजन तणावात होते असे खालिद यांनी सांगितले. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता त्यांना पोलीस उपायुक्तांनी बोलावले होते. महाजन यांना त्यांनी कामावरून चांगले दमात घेतले होते असे पोलीस सुत्रांनी सांगितले. पत्नीशी भांडण आणि त्यातच वरिष्ठांची बोलणी यामुळे मानसिक खच्चीकरण झाल्यानेच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलेले जात आहे.
‘चुकून गोळी लागली’
घटनेची माहिती समजल्यानंतर चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गेलेल्या प्रसारमाध्यमांना पोलिसांनी बाहेर काढले. महाजन यांना चुकून गोळी लागली असे सहाय्यक पोलसी आयुक्त मिलिंद भिसे यांनी माध्यमांना सांगितले. हा आत्महत्येचा प्रयत्न नव्हता असा दावा करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे समाधान झाले नाही.
हवालदार ते सहाय्यक पोलीस आयुक्त
चंद्रकांत महाजन हे हवालदार म्हणून पोलीस खात्यात लागले. २००५ साली परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले आणि नंतर बढती मिळवून सहाय्यक पोलीस निरीक्षक झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा