दोन दात सोन्याचे असल्याच्या माहितीच्या आधारावर १५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात रफी किडवाई मार्ग पोलिसांना यश आले. आरोपी स्वतःची ओळख व नाव बदलून राहत होता. त्यामुळे पोलिसांनी विम्याच्या रकमेचे आमीष दाखवून त्याला मुंबईत बोलावून मोठ्या शिराफीने अटक केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा >>>“अदाणी शेअर बाजारातील ‘बिग बुल’, तर मोदी त्यांच्यासाठी…”; ‘काऊ हग डे’वरून शिवसेनेचं टीकास्र!
तक्रारदार ए. एच. गंगर (४०) यांचा हिंदमाता परिसरात कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपी प्रवीण आशुभा जडेजा उर्फ प्रवीणसिंह उर्फ प्रदीपसिंह आसुभा जडेजा (३८) १५ वर्षांपूर्वी त्यांच्याकडे कामाला होता. अन्य व्यापाऱ्यांकडे उसने असलेली रक्कम गंगर यांनी प्रवीणला आणण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी मिळालेल्या ४० हजार रुपयांचा आरोपीने अपहार केला होता. त्यावेळी सार्वजनिक शौचालयात लघुशंकेसाठी गेलो असता कोणीतरी रक्कम असलेली पिशवी चोरल्याचा खोटा बनाव त्याने केला होता. याप्रकरणी रफी किडवाई मार्ग पोलिसांनी भादंवि कलम ४०८ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. या गुन्ह्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी तो न्यायालयात हजर राहत नव्हता. अखेर दादर येथील न्यायालयाने त्याच्याविरोधात स्थायी अजामीनपात्र वॉरंट जारी करून त्याला फरार घोषित केले होते.
हेही वाचा >>>राज्यात आजपासून ‘वंदे भारत’; देशातील नवव्या, दहाव्या रेल्वेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
गेल्या १५ वर्षांपासून आरोपी फरार होता. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानंतर सध्या मुंबईत फरार आरोपींना अटक करण्याबाबत मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखडे, पोलीस हवालदार नारायण कदम, सुरेश कडलग, रवींद्र साबळे, महिला पोलीस शिपाई विद्या यादव व पोलीस शिपाई सुशांत बनकर यांनी तपासाला सुरूवात केली. पण आरोपीने दुकानात तात्पूर्त्या वास्तवाचा पत्ता दिला होता. त्याचे छायाचित्र व मूळ गाव याची माहिती पोलिसांकडे नव्हती. त्याच्या सोबत काम केलेल्या व्यक्तींकडूनही महत्त्वाची माहिती मिळत नव्हती. अखेर आरोपीचे पुढील दोन दात सोन्याचे असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्याच्या आडनावावरून आरोपी गुजरातमधील कच्छ येथील रहिवासी असल्याचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी गुप्त बातमीदारांना या माहितीच्या आधारे कामाला लावले. अखेर सोन्याचे दात, वयोगट, कामधंदा या गोष्टींशी मिळताजुळती व्यक्ती तेथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कल्पकता दाखवून विम्याचा अवधी संपला असल्यामुळे पैसे घेण्यासाठी आरोपीला मुंबईत बोलावले. या आमीषाला आरोपी भुलला, अखेर मुंबईत आल्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. तो प्रवीण असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अखेर त्याला पोलिसांनी या गुन्ह्यात पुन्हा अटक केली. विशेष म्हणजे आरोपीने पोलिसांनाचा ससेमिरा चुकवण्यासाठी प्रवीणऐवजी प्रदीपसिंह असे नाव बदलले होते. पण त्यानंतरही पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या.