मुंबई : मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे जल्लोषात स्वागत करताना नियमांना तिजांजली देत बेतालपणे वाहने चालविणाऱ्या तब्बल १७ हजार ८०० वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून त्यामध्ये ३३३ मद्यपी चालकांचा समावेश आहे. शिवाय विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या तीन हजार ५०० दुचाकीस्वारांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. मुंबईतील सर्व पोलीस ठाणी व वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. नियम धाब्यावर बसविणाऱ्या चालकांवर ८९ लाख १९ हजार रुपये दंड आकारण्यात आला. मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी तब्बल १४,५०० पोलीस तैनात करण्यात आले होते.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस आठवडाभर विशेष मोहीम राबवीत होते. नववर्षाच्या पूर्वसंध्येलाही वाहतूक पोलिसांनी १०७ ठिकाणी नाकाबंदी केली होती. या वेळी वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी २८९३ जणांवर कारवाई करण्यात आली. विनाहेल्मेट १९२३ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय प्रवासी भाडे नाकारणाऱ्या १९७३ रिक्षा, टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात आली, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

52 year old High Court lawyer cyber frauded of Rs 1 5 crore by luring him to make good profits by buying and selling shares
उच्च न्यायालयातील वकिलाची दीड कोटींची सायबर फसवणूक
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Amul is setting up Maharashtras largest ice cream project
पुण्यात ‘अमूल’चा आईस्क्रीम प्रकल्प जाणून घ्या, प्रकल्प किती मोठा, परिणाम काय
Mumbai felt hotter on Wednesday due to humidity despite
वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकर उकाड्याने त्रस्त
This year, Rabi is expected to be planted on a record area
ज्वारीची पेरणी घटली; मका, करडईची वाढली जाणून घ्या, रब्बी हंगामातील पेरण्यांची पीकनिहाय स्थिती
Image of Diljit Dosanjh
Diljit Dosanjh : “त्याला खरंच काळजी असती तर…” पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने दलजीत दोसांझवर शेतकरी आंदोलक संतापले
Bollywood actors welcomed new year by enjoying tourism in their favorite foreign destinations
बॉलिवूड कलाकारांनी परदेशात केले नववर्षाचे स्वागत
Sameer Wankhede statement on Aryan Khan case
Sameer Wankhede : समीर वानखेडे आर्यन खान प्रकरणाबाबत म्हणाले, “मला जर संधी मिळाली तर मी पुन्हा…”

हेही वाचा…नववर्षात ३५ हजार घरे राष्ट्रीय उद्यान परिसर २७ हजार झोपड्यांच्या पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन; अभ्युदयनगर, जीटीबीनगर पुनर्विकास कामही लवकरच

याशिवाय सिग्नल तोडणाऱ्या १,७३१, प्रवेश मनाई असलेल्या मार्गावरून वाहन नेणाऱ्या ८६८, अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या ८४२, झेब्रा क्रॉसिंगपूर्वी वाहन न थांबवणाऱ्या ४४० जणांवर, सीट बेल्ट न लावता वाहन चालवणाऱ्या ४३२, गणवेशाशिवाय टॅक्सी अथवा रिक्षा चालवणाऱ्या २०० , दुचाकीवर तिघांनी प्रवास करणाऱ्या १२३, वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणाऱ्या १०९, विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या ४०, नियमबाह्य प्रकारे हॉर्न वाजवणाऱ्या २०, असुरक्षितरीत्या वाहन चालवणाऱ्या दोघांवर आणि मुंबई वाहन कायद्याअंतर्गत पाच हजार ४६७ जणांवर कारवाई करण्यात आली. या सर्वांविरोधात एकूण १७ हजार ८०० ई – चलन जारी करण्यात आले असून त्याअंतर्गत ८९ लाख १९ हजार ७५० दंड आकारण्यात आला आहे. या वेळी मुंबई पोलिसांनी ४६ हजार १४३ वाहनांची तपासणी केली.

हेही वाचा…उत्तन-विरार सागरी सेतू, १५ दिवसांत सविस्तर आराखडा सरकारकडे मंजुरीसाठी

निर्भया पथकांची नेमणूक

नवीन वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक तरुणी, महिला तसेच अल्पवयीन मुली घराबाहेर पडतात. मात्र नेमके यादरम्यान मद्याच्या नशेत धुंद झालेले अनेक जण महिलांची छेडछाड करतात अथवा विनयभंगसारख्या घटना घडण्याची शक्यता असते. असे प्रकार घडू नयेत यावर कटाक्षाने लक्ष ठेवण्याचे आदेश प्रत्येक पोलीस ठाण्याला देण्यात आले होते. त्यासाठी निर्भया पथकाला गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले होते. नववर्ष स्वागतानिमित्त ३० डिसेंबर रोजी सायंकाळपासूनच रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, वरळी सी फेस, बॅण्डस्टॅन्ड, जुहू चौपाटी या ठिकाणीही मोठ्या प्रमाणत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Story img Loader