अंधेरीमध्ये पोलिस व्हॅनला ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेमध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलचा सोमवारी मध्यरात्री मृत्यू झाला. या अपघातात सुमारे ३० पोलिस जखमी झाले आहेत. जखमींमध्ये १० महिलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.
बिस्लेरी जंक्शनजवळ हा अपघात घडला. युसूफ काझी असे मृत पावलेल्या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. जखमींवर व्ही. एन. देसाई आणि कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघाताचे स्वरुप भीषण होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
(संग्रहित छायाचित्र) 

Story img Loader