एका बांधकाम व्यावसायिकाला बनावट गुन्ह्य़ात अडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि हा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून व्यावसायिकाकडे वीस लाखांची खंडणी मागणाऱ्या कल्याण गुन्हे शाखेतील तुळशीराम पावशे या पोलिसाला गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) पाच लाखांची लाच घेताना  अटक केली. गणेश ढोणे या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात पावशे व अन्य चार सहकारी गेले. तुमच्याजवळ पिस्तूल आहे. याप्रकरणी तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो असे भासवून या पोलिसांनी ढोणे यांच्याकडे वीस लाखांच्या खंडणीची मागणी केली. आठ लाखांवर तडजोड करण्यात आली. त्यामधील तीन लाख रुपये ढोणे यांनी पोलिसांना दिले. उर्वरित पाच लाख गुरुवारी देण्याचे ठरले. एसीबीने रचलेल्या सापळ्यात पावशे अलगद सापडला.   

Story img Loader