मुंबई : भांडण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण करण्यात आल्याची घटना विलेपार्ले परिसरात घडली. या हल्ल्यात पोलीस शिपाई संदीप साळुंखे यांच्यासह आणखी एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली. सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गौस इकलाख (२५) याला अटक करण्यात आली.

वरळी येथे वास्तव्यास असलेले संदीप साळुंखे जुहू पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. राहुल इरा शर्मा आणि गौस इकलाख हे सोमवारी हनुमान नगर परिसरात भांडत होते. हा प्रकार तेथे गस्त घालणाऱ्या जुहू पोलिसांच्या निदर्शनास आला. तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी शर्मा आणि इकलाख यांच्यातील भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र इकलाख याने संदीप साळुंखे यांच्यासह अन्य एका व्यक्तीसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना शिवीगाळ करून लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली.

Mumbai passenger boat sank in Elephanta area on Wednesday evening
एलिफंटाजवळ प्रवासी बोट बुडाली, एक जण ठार
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
Bengaluru Diwali Firecrackers accident
VIDEO: “फटाक्यावर बसला तर नवीकोरी रिक्षा घेऊन देऊ”; तरुणाला पैज भारी पडली, मृत्यूचा थरार कॅमेरात कैद
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Free blood test Aapla Dawakhana , Aapla Dawakhana ,
‘आपला दवाखाना’मधील मोफत रक्त तपासणी सेवा बंद, सेवा पुरविण्यास क्रस्ना डायग्नोस्टिकचा नकार
मुंबईतील १६ वर्षीय मुलीवर रिक्षाचालक आणि सहा मुलांचा सामूहिक बलात्कार; कुठे घडली ‘ही’ संतापजनक घटना?
Fraud case filed against three brokers including Gujarati man for submitting forged visa documents
अमेरिकन वकिलातीत बनावट कागदपत्र सादर करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

हेही वाचा…एलिफंटाजवळ प्रवासी बोट बुडाली एक जण ठार

या घटनेची माहिती मिळताच जुहू पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तिथे दाखल झाले. साळुंखे आणि अन्य एका व्यक्तीवर हल्ला करणाऱ्या इकलाखला पोलीस पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. संदीप साळुंखे यांच्या तक्रारीवरून इकलाखविरुद्ध पोलिसांना शिवीगाळ करुन लाथ्याबुक्यांनी मारहाण करणे, पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सायंकाळी इकलाखला अटक केली. इकलाख अंधेरीतील एस. व्ही रोड, इर्ला पुलाजवळील छोटू हसन चाळीत वास्तव्याला असून तो रिक्षाचालक आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Story img Loader