लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबईः दोन गटांमध्ये सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी मालाड परिसरात घडला. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी मारहाण करणे व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.

up firing news, marathi news, bahraich violence
बहराइच हिंसाचार : गोपाल मिश्रा हत्या प्रकरणातील आरोपींवर पोलिसांचा गोळीबार; नेपाळ सीमेवर झालेल्या चकमकीत दोघे जखमी
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Traffic altered due to Dussehra Mela and Devi Visarjan at Shivaji Park
विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीच्या धडकेत पोलीस जखमी
mandul snake that is sold for lakhs of rupees is given life
लाखो रुपयांना विकल्या जाणाऱ्या सापाला जीवदान
beggar woman arrested for stealing gold worth rs 35 lakh and cash from house
पुणे : भीक मागण्याचा बहाण्याने चोरी करणारी तरुणी गजाआड, ३५ लाखांचे दागिने जप्त; चंदननगर पोलिसांची कारवाई
Two arrested by crime branch in murder case Pune news
खून प्रकरणात चार वर्ष पोलिसांना गुंगारा- गुन्हे शाखेकडून दोघे गजाआड
The Lok Adalat ordered Rs 4 crore compensation for bike riders family after collision
अपघातात मृत पावलेल्या दुचाकीस्वाराच्या कुटूंबियांना साडेचार कोटींची नुकसान भरपाई, मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे आदेश
Lizard fell in curry, people in poisoned Bhandara,
धक्कादायक… भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात ५१ जणांना विषबाधा

तक्रारदार पोलीस हवालदार कुंडलिक धिघे मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. मालवणी गाव परिसरात दोन गटांमध्ये मारामारी सुरू असल्याची तक्रार मालवणी पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचल्यावर दोन गटांमध्ये मारामारी सुरू होती.

आणखी वाचा-फेरीवाला धोरणाचा अर्थ कुठेही दुकान थाटावे असा होत नाही, उच्च न्यायालयाने बजावले

पोलिसांनी दोन्ही बाजूच्या व्यक्तींना समजवण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यातील सूरज नावाच्या व्यक्तीने पोलिसांना धक्काबुक्की केली. त्यावेळी एका अनोळखी महिलेनेही पोलिसांना मारहाण केली. त्यांना सोडवण्यासाठी गेलेल्या इतर पोलिसांनाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सूरज प्रसाद, यास्मिन प्रसाद, राज कशाळकर, योगेश कशाळकर व योजना कशाळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांना मारहाण व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून या पाच जणांना अटक करण्यात आली.