मुंबई : स्वातंत्र्यानंतर देशातील उद्योग क्षेत्राची पायाभरणी करणाऱ्या अनेक दिग्गजांना घडवणारे सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आता राजकीय महत्वाकांक्षांच्या कचाट्यात अडकले आहे. शैक्षणिक स्वायत्तता असलेल्या या महाविद्यालयाची प्रत्येक विकासकामासाठी अडवणूक करण्याचे धोरण प्रशासनाने अवलंबले असून कालसुसंगत नवे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठीही आडकाठी करण्यात आली आहे. संस्थेतील राजकीय वादांमध्ये विद्यार्थ्यांना संधींना मुकावे लागत आहे. गल्लोगल्ली खासगी महाविद्यालयांचे पीक उगवण्यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात अभियांत्रिकी शिक्षणाची दारे वालचंद कॉलेजने उघडली. स्वातंत्र्य मिळवून देश नव्या पर्वात प्रवेश करत असताना, १९४७ सालीच या महाविद्यालयाची स्थापना झाली होती. राज्यात खासगी महाविद्यालयांना परवानगी देण्याचे धोरण अंमलात येण्यापूर्वी आर्थिक अडचणीत असलेल्या या महाविद्यालयाला शेट वालचंद हिराचंद यांनी सावरले. स्थापनेपासूनच दर्जा टिकवून ठेवणाऱ्या या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याची चढाओढ असते. मात्र, आता प्रत्येक टप्प्यावर केल्या जाणाऱ्या अडवणुकीमुळे महाविद्यालयाचे व्यवस्थापन बेजार झाले आहे. राजकीय महत्वाकांक्षा आणि महाविद्यालयावर ताबा मिळवण्याच्या चढाओढीत अभियंत्यांच्या अनेक पिढ्या घडवणाऱ्या या महाविद्यालयापुढे अडचणींचे डोंगर उभे करण्यात येत आहेत. प्रशासकीय बाबी, न्यायालयीन प्रकरणे या सगळ्याच्या पलिकडे जाऊन शैक्षणिक बाबींमध्येही सातत्याने अडवणूक करण्यात येत आहे.
वालचंद महाविद्यालय बळकाविण्यासाठी अडवणुकीचे सत्र
शासकीय बाबी, न्यायालयीन प्रकरणे या सगळ्याच्या पलिकडे जाऊन शैक्षणिक बाबींमध्येही सातत्याने अडवणूक करण्यात येत आहे.
Written by रसिका मुळ्ये
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-10-2024 at 05:49 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political disputes in walchand college of engineering zws