पोलिसांच्या बदल्यांच्या अधिकारावरून राज्य सरकार आणि पोलीस दल यांच्यात ‘तू तू मै मै’ सुरू असतानाच, मर्जीतील अधिकाऱ्याच्या बदल्यांसाठी रदबदली करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि राजकीय पुढाऱ्यांचे पितळही उघडे पडले आहे. बदल्यांचे कोणतेच अधिकार आपल्या हाती नसल्याने आता दंडुका तरी द्या, अशी केविलवाणी विनवणी करणारे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडेही रदबदलीची पत्रे साचली असून, बदलीसाठी धडपडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे हात राजकारणात कुठपर्यंत ‘पोहोचलेले’ असतात, हेही या निमित्ताने उघड झाले आहे.
चारच दिवसांपूर्वी राज्यातील दीडशे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. काहींना बढत्याही मिळाल्या. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांवर आपली वर्णी लावावी म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले. अनेक आमदार, राजकारणी आणि नेत्यांमार्फत सेटिंग लावायला सुरुवात केली. माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली आहे. बदल्या होणार आहेत, याची पूर्वकल्पना असल्याने अनेकांनी महिन्याभरापासूनच शिफारशींची पत्रे मिळवून ती मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचतील याची पुरेपूर खबरदारी घेतली आहे. काँग्रेसचे वजनदार खासदार ऑस्कर फर्नाडिस, खासदार संजय निरुपम, यांच्यासह कालिदास कोळंबकर, दिलीप माने आदी अनेक आमदारांनाही पोलिसांच्या या ‘सेटिंग’साठी आपले वजन वापरण्याचा मोह आवरता आलेला नाही, हेही स्पष्ट झाले आहे. संबंधित पोलीस अधिकारी हे आपल्या परिचयाचे, मतदारसंघातले असून त्यांचे कार्य चांगले असल्याचा दाखला अनेक नेत्यांच्या रदबदलीपत्रात दिसतो.

नियम काय सांगतो?
राज्य पोलिसांच्या माहितीपुस्तिकेतील कलम ४१३ अन्वये पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या बढत्यांसारख्या धोरणात्मक बाबींमध्ये राजकीय हस्तक्षेपास मनाई आहे.  बदल्या-बढत्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप उघड झाल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. तरीसुद्धा या अधिकाऱ्यांनी नियमभंग करुन बदल्यांसाठी राजकारण्यांची शिफारस पत्रे घेतल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी सांगितले.

पोलीस-राजकारण्यांचे लागेबांधे उघड
मुंबई : पोलीस व राजकारणी यांचे एकमेकांत हितसंबंध गुंतले असल्याने गुन्हेगारीला पायबंद लागत नसल्याचे अनेकदा पाहायला मिळते. त्याचेच आणखी एक उदाहरण म्हणजे मर्जीतल्या पोलिसांच्या बदल्यांसाठी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे पडणारा शिफारसपत्रांचा पाऊस. राजकारण्यांच्या ‘कृपे’ने बदल्या मिळवलेल्या पोलिसांकडून मग राजकारणातील गुन्हेगारीला प्रतिबंध बसेल याची अपेक्षा कशी बाळगायची, असा प्रश्न आहे.

खालीलप्रमाणे नेत्यांनी अगदी संबधित ठिकाणासह शिफारसपत्रे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे पाठविली आहेत.
 नेते                   शिफारस केलेल्या अधिकाऱ्याचे नाव                                          कुठे                    कुणाकडे
* ऑस्कर फर्नाडिस           अशोक बोरसे,
    (खासदार)             वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पश्चिम नियंत्रण विभाग     ओशिवरा,                    मुख्यमंत्री
* कालिदास कोळंबकर       प्रकाश आव्हारे,
   (आमदार)                 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मरोळ सशस्त्र विभाग     साकीनाका                   मुख्यमंत्री
* भारत तुकाराम भाळके         दिनकर मोहिते
                           वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर                                 पंढरपूर शहर                   मुख्यमंत्री
* बाळासाहेब बोरगे              विठ्ठलराव देसाई
                           वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोईवाडा, भिवंडी                   नवीन पनवेल                 मुख्यमंत्री
* नीलेश देशमुख पारवेकर      एन. डी. कोकरे
                          वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुर्भे, एमआयडीसी रबाळे,   एमआयडीसी                  सतेज पाटील
*  भानुदास माळी             एम. जे. भिंगारदिव    बोरीवली, दिंडोशी, समतानगर, आरे         आर. आर. पाटील
(प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी)      वरिष्ठ पोलीस निरीक्षक,             मरोळ सशस्त्र ४  

* दिलीप माने              गजेंद्र मनसावळे     विजापूर नाका पोलीस स्टेशन                                मुख्यमंत्री
(विधान परिषद सदस्य)              वरिष्ठ पोलीस निरीक्षक,                  सोलापूर
                                 पारसी पोलीस ठाणे   सोलापूर                       
* राजेंद्र राऊत             गजेंद्र मनसावळे     विजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापूर                      मुख्यमंत्री
(माजी आमदार)                  वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
                                       पारसी पोलीस ठाणे                                    सोलापूर
* सदाशिव सपकाळ            दादासाहेब वामन बोरसे                        साकीनाका              आर. आर. पाटील
(माजी आमदार, पावळी )    वरिष्ठ पोलीस निरीक्षक.   मरोळ सशस्त्र
* संजय निरुपम            अंबादास पवार              कस्तुरबा पोलीस ठाणे                                   मुख्यमंत्री
(खासदार)                   वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
*  संजय निरुपम             राजेंद्र ठाकूर        दिंडोशी पोलीस ठाणे                                             मुख्यमंत्री
(खासदार)             वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
* रमेश ठाकूर            प्रकाश नाना जाधव                                     गोराई                                मुख्यमंत्री
            वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे अन्वेषण
रोहिदास पाटील          रामराव सोमवंशी                                    धुळे ग्रामीण                         मुख्यमंत्री
(उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेस कमिटी) वरिष्ठ पोलीस निरीक्षक,             धुळे

Story img Loader