पोलिसांच्या बदल्यांच्या अधिकारावरून राज्य सरकार आणि पोलीस दल यांच्यात ‘तू तू मै मै’ सुरू असतानाच, मर्जीतील अधिकाऱ्याच्या बदल्यांसाठी रदबदली करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि राजकीय पुढाऱ्यांचे पितळही उघडे पडले आहे. बदल्यांचे कोणतेच अधिकार आपल्या हाती नसल्याने आता दंडुका तरी द्या, अशी केविलवाणी विनवणी करणारे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडेही रदबदलीची पत्रे साचली असून, बदलीसाठी धडपडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे हात राजकारणात कुठपर्यंत ‘पोहोचलेले’ असतात, हेही या निमित्ताने उघड झाले आहे.
चारच दिवसांपूर्वी राज्यातील दीडशे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. काहींना बढत्याही मिळाल्या. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांवर आपली वर्णी लावावी म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले. अनेक आमदार, राजकारणी आणि नेत्यांमार्फत सेटिंग लावायला सुरुवात केली. माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली आहे. बदल्या होणार आहेत, याची पूर्वकल्पना असल्याने अनेकांनी महिन्याभरापासूनच शिफारशींची पत्रे मिळवून ती मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचतील याची पुरेपूर खबरदारी घेतली आहे. काँग्रेसचे वजनदार खासदार ऑस्कर फर्नाडिस, खासदार संजय निरुपम, यांच्यासह कालिदास कोळंबकर, दिलीप माने आदी अनेक आमदारांनाही पोलिसांच्या या ‘सेटिंग’साठी आपले वजन वापरण्याचा मोह आवरता आलेला नाही, हेही स्पष्ट झाले आहे. संबंधित पोलीस अधिकारी हे आपल्या परिचयाचे, मतदारसंघातले असून त्यांचे कार्य चांगले असल्याचा दाखला अनेक नेत्यांच्या रदबदलीपत्रात दिसतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा