मुंबई : मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता खालावली असतानाच रविवारी टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आवाज फाऊंडेशन’ने मॅरेथॉनच्या ४८ तास आधी म्हणजेच शुक्रवारी मॅरेथॉन मार्गावरील प्रदूषणाची चाचणी केली असून आठ ठिकाणी पीएम २.५ प्रदूषकांमध्ये वाढ झाली आहे. माहीम रेतीबंदर परिसरात सर्वाधिक प्रदूषण असल्याचे या संस्थेने सांगितले.

मॅरेथॉन धावणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी मुंबई मॅरेथॉनचा मार्ग प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. सिटिझन्स सायन्स इनिशिएटिव्हअंतर्गत ‘आवाज फाऊंडेशन’ने सेन्सर आधारित मॉनिटर वापरून मुंबई मॅरेथॉन मार्गावरील प्रदूषणाची पातळी मोजली. आठ ठिकाणी पीएम २.५ प्रदूषकाची पातळी असल्याची नोंद संस्थेने केली. अॅटमॉस सेन्सरआधारित ‘एअर क्वालिटी मीटर’ वापरून हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या उपकरणाद्वारे ही चाचणी करण्यात आली. मॅरेथॉन मार्गावरील निवडलेल्या आठ ठिकाणी दोन वेळा नोंदी घेण्यात आल्या. मॅरेथॉनच्या वेळेनुसार म्हणजे पहाटे ५ वाजल्यापासून सकाळी ८.२७ वाजेपर्यंत ही चाचणी घेण्यात आली.

shivaji nagar mumbai pollution
मुंबई : शिवाजी नगरमधील वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mumbai dust latest news in marathi
दोन महिन्यांमध्ये मुंबईतील पीएम २.५ धूलीकणांमध्ये वाढ
health issues due to pollution in sangli news in marathi
सांगलीत ‘दत्त इंडिया’कडून जल, वायू प्रदूषण; आरोग्यास धोका निर्माण झाल्याची तक्रार
MIDC has initiated efforts to rebuild the 3 6 km channel carrying effluents in Belapur
ठाणे वाशी खाडी लवकरच प्रदूषणमुक्त, रासायनिक सांडपाण्यासाठी नव्या वाहिनीचा प्रस्ताव
air pollution mumbai Constructions
बोरिवली, भायखळ्यातील बांधकामे निर्बंधमुक्त, गोवंडी शिवाजीनगर निरीक्षणाखाली; वायू प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांवर नजर
Shivaji Park ground, dust , Maharashtra Pollution Control Board, municipal corporation,
१५ दिवसांत पालिकेने शिवाजी पार्क मैदानातील धूळीबाबत कार्यवाही करावी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्षाचे आदेश
Chandrapur air pollution annual statistics year 2024
चंद्रपुरातील प्रदुषणात घट; काय सांगते वार्षिक आकडेवारी? जाणून घ्या…

हेही वाचा >>> गुंतवणुकीत प्रादेशिक समतोल; दावोस दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

पीएम २.५ म्हणजे काय?

पीएम २.५ म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर २.५. हे हवेतील अतिशय सूक्ष्म कण असतात. या कणांचा व्यास २.५ मायक्रॉन किंवा त्याहून कमी असतो. हे कण श्वासाद्वारे सहजपणे मानवाच्या शरीरात प्रवेश करू शकतात. शकतो. पीएम२.५ चा जास्त प्रमाणात संपर्क आल्यास अस्थमा, त्वचाविकार इत्यादी आजार होऊ शकतात.

आयोजकांना सूचना

हवेची गुणवत्ता खालावलेली असताना धावणाऱ्या धावपटू आणि इतर सहभागींना याबाबत कल्पना देऊन योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करावे, असे ‘आवाज फाऊंडेशन’ने आयोजकांना सूचित केले आहे. तसेच केवळ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठीच नव्हे तर सर्व मुंबईकरांसाठी सार्वजनिक आरोग्य सूचना आणि नियमित बुलेटिन जारी करावे, अशी विनंती मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) करण्यात आली आहे.

कुठे, किती प्रदूषण?

माहीम रेतीबंदर : १५४ (प्रदूषणाची सर्वाधिक पातळी)

खान अब्दुल गफार खान मार्ग : ९५ (प्रदूषणाची कमी पातळी)

शिवाजी पार्क, दादर : ११६-१२५

जसलोक रुग्णालय : ११२-१२५

मरिन ड्राइव्ह : १२३-१३७

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस : ११४-१४३

(आकडेवारी ‘मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर’मध्ये)

Story img Loader