Poonam Mahajan : माझ्या वडिलांची हत्या झाली तेव्हाही मी बोलले होते. प्रमोद महाजन यांची हत्या हा कौटुंबिक विषय नव्हता तर ते एक खूप मोठं षडयंत्र होतं. प्रमोद महाजन यांना रोखण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आली. माझं तिकिट लोकसभेला कापण्यात आलं तेदेखील एक षडयंत्र आहे असं मला वाटतं. मी ते षडयंत्र काय होतं? कुणी रचलं याच्या शोधात मी पडत नाही. या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत. मी काम करण्याला जास्त महत्त्व देते असं पूनम महाजन ( Poonam Mahajan ) यांनी म्हटलं आहे.

माझ्या वाट्याला संघर्ष आला आहे मी वाटचाल करते आहे

संघर्ष वाट्याला येतो तेव्हा संघर्ष करण्याला महत्त्व आहे. विधानसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही. प्रमोद महाजन यांची शिकवण माझ्यापुढे आहे. माझं तिकिट का कापलं हे विचारलंही नाही. तसंच मला खासदार केलं नाही म्हणून आमदार करा अशी मागणीही मी केली नाही. मी माझ्या कामांमधून बोलते. मी काही कुणाला सांगायला किंवा विचारायला जात नाही की तिकिट का कापलं? असंही पूनम महाजन ( Poonam Mahajan ) म्हणाल्या. लल्लन टॉपला पूनम महाजन यांनी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत पूनम महाजन ( Poonam Mahajan ) यांनी प्रमोद महाजन यांच्या हत्येबाबतही खुलासा केला आहे. तसंच तक्रार करणं माझा स्वभाव नाही असंही त्या म्हणाल्या.

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Poona Mahajan Said About Uddhav Thackeray ?
Poonam Mahajan : “लोकसभेला तिकिट कापण्यात आलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी…”, पूनम महाजन काय म्हणाल्या?
sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
Sanjay Raut slams Raj Thackeray (1)
Sanjay Raut: ‘राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे माफ करणार नाहीत’, प्रॉपर्टीच्या विधानावरून संजय राऊत यांची टीका
Mumbais air quality worsened from Diwali fireworks displays on first day itself
दिवाळीनंतरही मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा नाहीच!, सलग पाच दिवसांच्या घसरणीमुळे अशुद्ध हवा
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

२२ एप्रिल २००६ काय घडलं?

“माझ्या वडिलांवर जेव्हा गोळ्या झाडण्यात आल्या तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. त्यावेळी माझं लग्न झालं असल्याने मी प्रमोदजींच्या नाही तर माझ्या घरात राहात होते. ते घर दोन इमारती सोडूनच होतं. २२ एप्रिल २००६ ला जे घडलं तो प्रसंग आठवला की डोळ्यांत पाणी येतं. मी जेव्हा मुंबईत असायचे तेव्हा माझे वडील प्रमोद महाजन माझ्या घरी यायचे. आम्ही एकत्र जिमला जायचो. २२ एप्रिल २००६ ला सकाळी ७ वाजता मला त्यांचा फोन आला. बेटा मी तयार आहे तू तयार आहेस का? मी तेव्हा थोडीशी झोपेत होते, मी त्यांना म्हटलं बाबा १० ते १५ मिनिटांत मी तयार होऊन येते. मला वाटतं मी जर हे म्हटले नसते तर आज माझे वडील जिवंत असते. हे सगळं काय होतं ते कळलं नाही. पण मला फोन आला की बाबांवर (प्रमोद महाजनन) गोळीबार झाला आहे. मला आठवतही मी तडक उठून कशी पळाले ते. माझ्यासाठी तो खूप दुर्दैवी क्षण होता. ज्यांच्या मांडीवर खेळून मी लहानाची मोठी झाले तो त्या माझ्या बाबांना मला खांद्यावर उचलून घेऊन जावं लागलं. तो क्षण मी कधीही विसरु शकत नाही.” असं पूनम महाजन ( Poonam Mahajan ) म्हणाल्या.

हे पण वाचा- “मोदी तिसऱ्यांदा उभे, मग पूनम महाजनांचे तिकीट का कापलं?” विनोद तावडे म्हणाले, “पक्षाचा प्लॅन…”

प्रमोदजींचं रक्त माझ्या हातांना लागलं होतं, आणि…

पूनम महाजन ( Poonam Mahajan ) पुढे म्हणाल्या, “प्रमोदजी प्रखर बुद्धिमत्तेचे नेते होते. त्यांना हे वाटत होतं की मी असं काय केलं की गोळ्या झाडल्या गेल्या. माझी आई रडत होती, बाबा सोफ्यावर रक्तबंबाळ अवस्थेत बसले होते.सगळे पळापळ करत होते. अशा गोष्टी आपल्याला सून्न करुन टाकतात. मी त्यांना जेव्हा उचलून घेतलं तेव्हा ते मला म्हणाले माझा गुन्हा काय? त्यावर मी त्यांना म्हणाले हा आपल्या आयुष्याचा श्रीगणेशा आहे. तुम्ही घाबरू नका. मी त्यांना धीर देत होते. हॉस्पिटलचे ते १२ दिवसही मी कधीही विसरु शकत नाही. माझ्या हातांना त्यांचं रक्त लागलं होतं. माझे वडील जाऊन १८ वर्षे झाली आहेत. आजही तो त्यांच्या रक्ताचा वास मी रोज सकाळी अनुभवू शकते. असे काही क्षण असतात जे तुम्ही कधीही विसरु शकत नाही.” असंही पूनम महाजन ( Poonam Mahajan ) म्हणाल्या.

रुग्णालयातले ते १२ दिवस मी कधीही विसरु शकत नाही

वडील हे वडीलच असतात, त्यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. रुग्णालयातले ते १२ दिवस कधीही विसरु शकत नाही. माझे वडील किती महान आहेत हे मला त्या १२ दिवसांमध्ये आणखी जास्त प्रकर्षाने समजलं. मी आजही देशात कुणाच्या घरी गेले तर मला प्रमोद महाजन यांनी कशी मदत केली याचा एक तरी किस्सा ऐकायला मिळतोच. प्रमोद महाजन लोकांच्या मनामनांत जिवंत आहेत याची खात्री मला तेव्हा मनोमन पटते. असंही पूनम महाजन यांनी म्हटलं होतं.

Story img Loader