मुंबई : शिवसेना २५ वर्षे युतीत सडली, असे वक्तव्य करण्याची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व माझीही लायकी नसल्याची टीका भाजप खासदार पूनम महाजन यांनी रविवारी केली. ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन हे रात्री दहा-साडेदहाला झोपत होते व तरीही त्यांनी पक्ष वाढविला. त्यासाठी मध्यरात्री दोन व चार वाजेपर्यंत बैठका घेण्याची त्यांना गरज नव्हती, असे सांगून पूनम महाजन यांनी ज्येष्ठ भाजप नेत्यांना अप्रत्यक्षपणे टोलेबाजी केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

प्रमोद महाजन यांच्या ७३ व्या जन्म दिनानिमित्त ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांच्या गीतरामायण कार्यक्रमाचे आयोजन रविवारी केले होते. प्रमोद महाजन हे कधी कोणाचे  साहेब  नव्हते, प्रमोदजी होते. ते असामान्य व्यक्तिमत्त्व होते. केवळ रालोआतील नव्हे, तर मुलायमसिंह यादव, शरद पवार, ममता बनर्जी यांच्यासह देशातील अनेक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी प्रमोद महाजन यांचे मैत्रीचे संबंध होते, असे सांगून पूनम महाजन म्हणाल्या, भाजप-शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांची युती होती. त्यांनी विचार केला व दोन्ही पक्षांनी पुढे वाटचाल केली. त्यामुळे शिवसेना २५ वर्षे युतीत सडली, या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याने मला वाईट वाटले. त्यांनी युती केली नव्हती. हा त्यांच्या व माझ्या वडिलांचा आणि त्यापेक्षा उत्तुंग नेत्यांचा अपमान आहे.

loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
Peoples representatives do not want helmets then why police insisting Jan Manch organization Question
लोकप्रतिनिधींना हेल्मेट नको, मग पोलिसांचाच आग्रह का? जनमंचचे राजीव जगताप म्हणतात, ‘पायी चालणाऱ्यांनाही…’
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त

प्रमोद महाजन जेव्हा अंतिम घटका मोजत होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात भेटायला आले होते. ‘प्रमोद, तू ऊठ, तुझी गरज आहे,’ असे ते वडीलकीच्या नात्याने म्हटले होते. ते युतीसाठी होते की वैयक्तिक संबंधांसाठी होते, असा सवालही पूनम महाजन यांनी केला.

ज्येष्ठ भाजप नेत्यांना टोले ?

प्रमोद महाजन हे रात्री दहा-साडेदहाला झोपून सकाळी साडेपाचला उठत. सर्वभाषिक वृत्तपत्रे वाचन, व्यायाम, दूरध्वनी, पत्रलेखन आदी वक्तशीरपणे होते. त्यांना पक्षवाढीसाठी मध्यरात्री दोन व चापर्यंत बैठका घेण्याची गरज भासली नाही, असे पूनम महाजन यांनी सांगितले. रामभाऊ म्हाळगी संस्थेला गेल्या आठवडय़ात ४० वर्षे झाली. प्रमोद महाजन यांनी केशवसृष्टी येथे जागा घेऊन आणि विचाराधित स्वरूप देऊन ही संस्था नावारूपाला आणली. या संस्थेत प्रमोद महाजन यांचे छोटे छायाचित्र आहे. मात्र ४० वर्षांच्या वाटचालीनिमित्ताने प्रमोद महाजन यांच्या योगदानाबद्दल संस्थेने किमान समाजमाध्यमांवर एखादा संदेश जरी प्रसारित केला असता, तर मला त्यांची मुलगी म्हणून बरे वाटले असते, अशी टिप्पणी पूनम महाजन यांनी केली. म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी फडणवीस यांची गेल्या वर्षी निवड झाली आहे.

आता नेत्यांचे कपडे व जाकिटांचा उल्लेख करून प्रमोद महाजन हे केवळ पांढरा कुडता व पायजमा घालत आणि त्यांची केवळ दोन जाकिटे होती, असे त्यांनी नमूद केले. तरीही महाजन यांच्यावर ‘ पंचतारांकित संस्कृती ’ ची टीका झाली होती. ‘ इंडिया शायनिंग ’ हे प्रचार अभियान अर्थखात्याचे होते. पण महाजन यांच्यावर टीका झाली व त्यांनी आपला पक्ष म्हणून ती स्वीकारली. प्रमोद महाजन हे राजकारणात असूनही दिलेला शब्द पाळायचे, असे नमूद करून पूनम महाजन यांनी राज्यातील एक मंत्री व चार वेळा खासदार झालेल्या एका नेत्याचा किस्सा सांगितला.

Story img Loader