साबरमती फ्रंटच्या धर्तीवर मिठी नदीचे नैसर्गिक रूप कायम ठेवण्यासाठी योजना आखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार पूनम महाजन यांनी सांगितले. पावसाळ्यात मिठी परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होत़े  त्यामुळे मिठीच्या साफसफाईची पाहणी करण्यासाठी महाजन यांनी शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत दौरा केला. या परिसरातील सर्व कामे एमएमआरडीए, महापालिका व संबंधित यंत्रणेने एकत्र येऊन सामायिकपणे केल्यास ते अधिक उपयुक्त होईल. साबरमती येथेही मिठीप्रमाणेच अवस्था होती. तेथे नदीचे शुद्धीकरण करून गतवैभव कायम ठेवण्यात आले.

Story img Loader