मॉडेल पूनम पांडे सध्या बेपत्ता असून मुंबई व बंगळुरू येथील पोलीस एका प्रकरणासाठी तिचा शोध घेत आहेत. पूनम पांडे हिने भगवान विष्णू यांच्या छायाचित्रासोबत अर्धनग्न अवस्थेत २०१२साली छायाचित्र काढले होते. यावर धार्मिक भावना दुखाविल्याप्रकरणी एस.उमेश यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि याप्रकरणी ३१ ऑक्टोबर रोजी बंगळुरू न्यायालयात सुनावणी आहे. पूनमला अातापर्यंत तीन समन्स बाजावण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम पांडे ही बेपत्ता असल्यामुळे तिला समन्स देऊ शकलो नाही. जून महिन्यामध्येही तिला समन्स पाठविण्यात आली होती. एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी पूनम पांडे परदेशी असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, कोणतीही ठोस माहिती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

Story img Loader