गावाकडची बायको (भा.ल. महाबळ), नकार (गुरुनाथ तेंडुलकर), राधिका (सुमित शेटे), जखमा उरी धरूनी (मोहना कारखानीस), अर्थ खऱ्या सुखाचा (अश्विनी ताम्हणकर), अपराजिता (सुशीला दुबे), वंदन (शुभा नाईक), सारं काही कुंकवासाठी (बंडा यज्ञोपवीत) हे लेख कुटुंबव्यवस्थेतील घडामोडी मांडणारे आहेत. येत्या ५० वर्षांतील कुटुंबे या परिसंवादात डॉ. सुलभा सुब्रमण्यम, डॉ. मृणाल मराठे, वैशाली शेवरे, अमेय कुलकर्णी, मनोरमा पुरोहित आणि स्मिता जोगळेकर यांचा सहभाग असून भविष्यातील कुटुंबव्यवस्थेवर परखड आणि वास्तववादी मते मांडण्यात आली आहेत.
’ संपादिका – रोहिणी हट्टंगडी, किंमत – १३० रुपये
श्री दीपलक्ष्मी
भारतीय स्त्रीची कहाणी या सत्रात लिहिलेले जुगार (गुरुनाथ तेंडुलकर), खतना (पंकज कुरुलकर), तो क्षण.. (वसुंधरा घाणेकर), जन्मकहाणी (पु.रा.रामदासी), गेम (श्री.श्री. जोशी) हे लेख वाचनीय आहेत. ललित लेखांत रश्मी कशेळकर, रेश्मा राणे-जाधव यांचे लेख, टॉमी हा अश्विनी आचार्य यांनी लिहिलेला लेख हे अंकाचे वैशिष्टय़ आहे. तसेच, चिं. ग. मनोहर, एस.ए. मुलानी, प्रभाकर दिघेवार, संभाजी पाटील आणि अरविंद गाडेकर यांनी चितारलेली हास्यचित्रे भावणारी आहेत. चला, चला लग्नाला चला हा लेख आकर्षित करणारा आहे.
’ संपादक – हेमंत रायकर, किंमत – २५०
चित्रलेखा
यंदाही चित्रलेखाने सर्वसमावेशक दिवाळी अंक वाचकांना देण्याचा प्रयत्न केला आहे. वाद्यांना आधुनिक करणारे किमयागार यामध्ये डॉ. विद्याधर ओक (हार्मोनियम), जयवंत उत्पात (हॅण्डसोनिक) आणि किशोर नांदोस्कर (बॅन्जो) यांच्या प्रवासाची माहिती देण्यात आलेली आहे. अनाथाश्रम ते अमेरिकन कंपनीची मालकी अशी संघर्षमय झेप घेणाऱ्या ज्योती रेड्डी यांची प्रेरणादायी कथा या अंकात देण्यात आलेली आहे. तसेच, विविध विषयांवर प्रबोधन करण्याचा प्रयत्न अंकात करण्यात आला आहे.
’ संपादक – ज्ञानेश महाराव, किंमत – ५० रुपये
साभार पोच
मनोकामना, मशाल, आनंदाचा सोहळा, झाली पहाट झाली, यशस्वी उद्योजक, कोकण मीडिया, स्वप्ना, स्वातंत्र्यवीर, उल्हास प्रभात, कथामाला, श्रावणी, विदर्भ न्याय, कायस्थ गौरव, दर्यावर्दी, अमृतधारा, आपला डॉक्टर, रंजन, सिनेनाटय़, जनश्रद्धा, उद्योगश्री, ग्रेट डेज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दर्याचा राजा, चौफेर, रंभा.