कुलदीप घायवट

कुरतडणाऱ्या (कृंतक) प्राण्यांच्या गटात मोडणारे साळिंदर सस्तन प्राणी आहे. कोणत्याही वातावरणात राहण्याची त्याची क्षमता असल्याने समुद्र सपाटीपासून २,५०० मीटर उंचीपर्यंत पश्चिम हिमालयातही त्याचे वास्तव्य आढळते. भारतात सर्व ठिकाणी साळिंदर आढळून येते. साळिंदर हे वजनदार व आखूड पायाचे प्राणी आहेत. त्याच्या पाठीमागे काटय़ासारखे टोकदार कडक केस असतात. त्याद्वारे ते शत्रूच्या हल्ल्यांपासून संरक्षण करते. साळिंदरच्या जवळ शत्रू आल्यास त्याच्याकडे पाठ करून उभे राहून काटय़ांना पसरते आणि भक्षकाच्या अंगावर टोकदार काटे वेगाने सोडते. अनेकदा बिबटे, वाघ हे देखील या काटय़ांमुळे जखमी होतात.

Sanjay raut criticise over Amit shah Lalbaugcha raja darshan
Sanjay Raut : “मुंबईतील उद्योग पळवले, आता लालबागचा राजा…”, अमित शाहांच्या दौऱ्याबाबत संजय राऊतांचा आरोप
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Sarbanand Sonowal asserts that the port is an attraction for the world
वाढवण बंदर जगासाठी आकर्षणबिंदू -सोनोवाल
ganpati mandaps erected on roads,
नाशिक : रस्त्यांवरील मंडपांमुळे वाहतुकीला अडथळा
Danger of accidents in Nashik due to potholed roads
खड्डेमय रस्त्यांमुळे नाशिकमध्ये अपघातांचा धोका
Nepal Bus Accident
Nepal Bus Accident : नेपाळ बस दुर्घटनेत जळगावमधील २४ जणांचा मृत्यू; वायुसेनेच्या विमानाने मृतदेह उद्या महाराष्ट्रात आणले जाणार
Maharashtra Crime News
Crime News : महाराष्ट्रात चाललंय तरी काय? बदलापूर, मुंबई अकोल्यासह मुलींवर अत्याचाराच्या मन सून्न करणाऱ्या घटना
police
‘महाराष्ट्र बंद’ची हाक; बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे आंदोलन

मुंबईत बोरिवलीस्थित संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात साळिंदर आढळून येते. साळिंदर हे गटाने किंवा एकटे फिरते. ते निशाचर असल्याने सायंकाळी किंवा रात्रीच्यावेळी बिळातून बाहेर पडते तर दिवसभर त्यांनी स्वत: खोदलेल्या बिळात राहाते. त्यांची बिळे मुख्य तोंडापासून खूप खोलपर्यंत खोदलेली असतात. तसेच आपत्कालीन परिस्थितीत बिळातून बाहेर पडण्यासाठी त्याला आणखी दोन ते तीन तोंडे करून ठेवलेली असतात. पूर्ण वाढ झालेल्या साळिंदरची लांबी अडीच ते तीन फूट असते व शेपूट ८ ते ९ सेमी लांब असते. वजन ११ ते १८ किलो असते. संपूर्ण शरीर काटेरी केसांनी आच्छादिलेले असते.

पाठीवरील काटे मोठे, टणक व दाट असतात. काटय़ांची लांबी १८ ते २० सेंमी असते. प्रत्येक काटय़ाचे शेवटचे टोक पांढरे, काटय़ांचा मधला भाग तपकिरी-काळा, पुन्हा आतील भाग पांढरा असतो. शत्रूवर हल्ला करण्यासाठी साळिंदर आपले शरीर फुगवून अंगावरील काटे ताठ करते. त्याच्या पाठीवरील काटे पडल्यानंतर तेथे नवे काटे येतात. त्यांचे गंधज्ञान अतिशय तीव्र असते. ते धान्ये, फळे, भाज्या, झाडांची मुळे, कंदमुळे खातात. शरीरात कॅल्शियम मिळवण्यासाठी हरणाची शिंगे किंवा प्राण्यांची हाडे खातात. साळिंदर साधारणपणे मार्च महिन्यात पिल्लांना जन्म देतात. नर आणि मादी दोघेही बिळामध्ये पिलांचे संगोपन करतात. पिलांचे डोळे जन्माला येताना उघडेच असतात. त्यांच्या शरीरावर मऊ व छोटे काटे असतात.

प्रत्येक प्राण्याकडे काही खास वैशिष्टय़ेपूर्ण अवयव असतात. त्या अवयवामुळे त्याची शिकार आणि तस्करी केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात या अवयवांना खूप मोठी मागणी असून त्यासाठी लाखोंची उलाढाल केली जाते. तसेच अंधश्रद्धा आणि वैद्यकीय क्षेत्रात प्राण्याच्या अवयवाचा वापर केला जातो. नखे, कातडी, दातासाठी बिबटय़ाची; खवले, नखांसाठी खवले मांजराची; मोराची पंखांसाठी, घुबडासाठी पंख, नखांसाठी; हरणाची कातडी, शिंगासाठी; सापाची विषासाठी; कासवाची कवचासाठी; घारीची नखांसाठी; तर साळिंदरची काटय़ासाठी तस्करी केली जाते. अनेक अंधश्रद्धेसाठी साळिंदरची शिकार केली जाते. या प्रजातीचे संरक्षण होण्यासाठी वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत अनुसुची चार नुसार साळिंदर संरक्षित प्रजाती आहे. त्यामुळे त्याला पाळल्यास, तस्करी केल्यास कायदेशीर कारवाई केली जाते.