पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अखेर जामीन मंजूर झाला आहे. राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन थोर्पे यांना कोर्टाने सोमवारी जामीन दिला. पोलिसांनी सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रात आपल्याविरोधात एकही पुरावा नाही, तसंच आपला या प्रकरणात सक्रीय सहभाग असल्याचाही पुरावा नसल्याचा दावा राज कुंद्राने कोर्टात केला होता. आपल्या विनाकारण गोवण्यात आल्याचा दावाही त्याने जामीन अर्जात केला होता. दरम्यान कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर राज कुंद्रा तब्बल दोन महिन्यांनी जेलमधून बाहेर आला आहे.
तब्बल ६२ दिवसांनी राज कुंद्राची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली आहे. सकाळी ११.३० वाजता राज कुंद्राची आर्थर रोड जेलमधून सुटका करण्यात आल्याची माहिती जेलच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पॉर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला जामीन मंजूर
राज कुंद्राला ५० हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने राज कुंद्राला जामीन मंजूर केलाय. राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन यांना पोलिसांनी १९ जुलैला अटक केली होती. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाने राज कुंद्राविरोधात एस्प्लेनेड न्यायालयासमोर 1500 पानी पुरवणी आरोपपत्र सादर केले आहे. या आरोपपत्रात शिल्पा शेट्टीसह ४३ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
पतीचा जामीन मंजूर होताच शिल्पा शेट्टीने केली पोस्ट, म्हणाली…
पॉर्नोग्राफी प्रकरणाच्या तपासादरम्यान, पोलिसांना राज कुंद्राच्या मोबाईल, लॅपटॉप आणि हार्ड ड्राइव्ह डिस्कमधून ११९ अश्लील व्हिडिओ सापडल्याचं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिलं आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार राज कुंद्रा हे व्हिडीओ ९ कोटी रुपयांना विकणार होता.
शिल्पा शेट्टीने नोंदवला होता जबाब
शिल्पाच्या साक्षीनुसार, राज कुंद्रा यांने २०१५ मध्ये “विआन इंडस्ट्रीज ली.’ नावाची कंपनी सुरू केली होती. त्या कंपनीमध्ये शिल्पा शेट्टीचे २४.५० टक्के समभाग होते. या कंपनीत शिल्पा एप्रिल २०१५ ते जुलै २०२० या कालावधीत संचालक पदावर होती. त्यानंतर तिने वैयक्तिक कारणास्तव संचालकपदाचा राजीनामा दिला असल्याचे साक्षीत सांगितले. हॉटशॉट अॅप व बॉली फेम या संदर्भात आपल्याला काही माहिती नसल्याचे तिने सांगितले. कामात व्यस्त असल्याने पती राज कुंद्रा काय करतो त्यांना माहिती नसल्याचे शिल्पाने जबाबात सांगितले आहे.